लग्नाची तयारी सुरू असतानाच नवरदेवानं मंडपातच केली आत्महत्या

लग्नाची तयारी सुरू असतानाच नवरदेवानं मंडपातच केली आत्महत्या

या घटनेमुळे आनंद ओसंडून वाहत असलेल्या लग्नमंडपात शोककळा पसरली

  • Share this:

हैदराबाद 10 नोव्हेंबर : लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातली महत्त्वाची घटना असते. मात्र लग्नाच्याच दिवशी आंध्र प्रदेशातल्या दोन कुटूंबांवर शोककळा पसरली. लग्नाला काही मिनिटं राहिलेली असतानाच नवरदेवाने लग्न मंडपातच फाशी घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली असून होणाऱ्या नवरीला जबर धक्का बसलाय. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर मुलींच्या वडिलांचीही प्रकृती बिघडलीय. नवरदेवाच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. आंध्र प्रदेशातल्या मेधचाल जिल्ह्यातल्या कोम्पल्ली  इथली ही घटना आहे. नवरदेवाचं नावं एनएस संदीप असं होतं. संदीप हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. इंजिनिअर असलेल्या मुलाचं लग्न असल्याने सर्व कुटुंबीय आनंदात होतं तर चांगला नवरा मिळाला म्हणून मुलीकडची मंडळी आनंदात होती. याबाबतचं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे.

पाकची विकृती! विंग कमांडर अभिनंदन यांचा चहाच्या कपासह उभारला पुतळा

दोन्ही घरातली ही आनंदाची घटना असल्यानं त्याची तयारीही जोरदारपणे करण्यात आली होती. लग्नासाठी सगळी पाहुणे मंडळी जमली होती. संदीपचे नातेवाईक जवळचे मित्र असे सगळे मंडपात जमले होते. लग्नासाठी हॉलही सजविण्यात आला होता. संदीप लग्नासाठी तयार होण्यासाठी हॉलच्या शेजारी असलेल्या रुममध्ये गेले होता.

लग्नाची वेळ जवळ येत होती आणि संदीपला खोलीतून यायला उशीर होत होता. त्याला जास्तिच उशीर होत असल्याने नातेवाईकांना शंका यायला लागली. त्यांनी दार ठोठावून पाहिलं मात्र त्यांना काही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे शेवटी खोलीचं दार तोडण्यात आलं त्यावेळी जे दृश्य दिसलं ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. संदीपने खोलीतल्या पंख्याला चादर बांधून फाशी घेतली होती.

अबब...स्विस बँकेत भारतीयांचे 300 कोटी पडून, दावा सांगणारं कुणीच नाही

संदीप हा हैदराबादमधल्या दिलसूखनगर भागात राहत होता. या घटनेमुळे आनंद ओसंडून वाहत असलेल्या लग्नमंडपात शोककळा पसरली. पोलिसांनी आत्महत्येची नोंद घेतली असून प्रकरणाची चौकशी सुरू केलीय. आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2019 09:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading