नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : जगभरात मोबाईल चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोबाईलच्या वेडासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. लहान मुलांनाही मोबाईलचे इतके वाईट व्यसन लागले आहे की ते काहीही करून जातात. दरम्यान, पश्चिम बंगालमधून यासंदर्भातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका अल्पवयीन मुलीने स्मार्टफोनसाठी थेट आपले रक्त विकण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक प्रकार समोर आला. थेट हॉस्पिटलच्या ब्लड बँकेत पोहोचली - ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील आहे. सोमवारी दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील एक अल्पवयीन मुलगी तिचे रक्त विकण्यासाठी बालूरघाट जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत पोहोचली. तिथे ती अधिकाऱ्यांशी व्यवस्थित बोलली, त्यानंतर अधिकाऱ्यांनी तिला हे का करायचे आहे, याचे कारण विचारले. यानंतर जेव्हा त्यांनी संपूर्ण हकीकत सांगितली तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले. हेही वाचा - नोकरी करते म्हणून पत्नीला अमानुष मारहाण करत व्हिडिओ बनवला; पोलिसांनी अशी घडवली अद्दल ती मुलगी स्वतःसाठी स्मार्टफोन घेण्याचा प्रयत्न करत होती आणि तिच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे तिने स्वतःचे रक्त विकायचे ठरवले. मुलीने स्वत: सांगितले की, तिने एका नातेवाईकाच्या फोनवरून स्वत:साठी ऑनलाईन मोबाइल मागवला आहे. आता भरण्यासाठी पैशांची गरज आहे. मुलीने तिचे नाव बदलून तिच्या घरापासून 30 किमी अंतरावर असलेल्या बालूरघाट येथे पोहोचली. मुलीचे वडील स्थानिक बाजारात भाजी विकतात आणि आई गृहिणी असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या घटनेनंतर ब्लड बँकेच्या अधिकाऱ्यांनी चाइल्डलाइनला ही माहिती दिली. यानंतर या मुलीचे समुपदेशन करून तिला जिल्हा बाल कल्याण समितीमार्फत तिच्या पालकांकडे पाठविण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.