पाटणा 11 मे : बिहारच्या गया जिल्ह्यातील एक अल्पवयीन मुलगा त्याच्या आईवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो आणि तिची काळजी घेतो. या अल्पवयीन मुलाची आई आजारी पडली तेव्हा तिच्या उपचारासाठी अल्पवयीन मुलाकडे पैसे नव्हते. वडील या जगात नाहीत. घरात कमावणारं कोणी नाही. अशा परिस्थितीत अल्पवयीन मुलाने काय केलं असेल? आईच्या उपचारासाठी त्याने किडनी विकण्यासाठी रांची येथील हॉस्पिटल गाठलं आणि ग्राहक शोधू लागला. यादरम्यान, त्याला ग्राहक मिळाला नाही, परंतु एक व्यक्ती भेटली. ज्याने त्याला RIMS हॉस्पिटलच्या डॉ. विकासला भेटायला लावले. डॉ. विकास यांनी अल्पवयीन मुलाला त्याच्या आईला रिम्समध्ये आणण्यास सांगितलं, जिथे तिच्यावर मोफत उपचार केले जातील. जगात पहिल्यांदाच 3 लोकांच्या DNA पासून जन्मलं बाळ, सामान्य लोकांपेक्षा त्याच्यात ‘ही’ गोष्ट अगदी खास मिळालेल्या माहितीनुसार, गया जिल्ह्यात राहणाऱ्या दीपांशु या अल्पवयीन मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्याच्या आईने त्याला सांभाळून वाढवलं. थोडं मोठं होताच दीपांशुने ठरवलं की आपण आपल्या पायावर उभा राहून आईला मदत करू. अशा परिस्थितीत तो रांचीला आला आणि येथील एका हॉटेलमध्ये काम करू लागला. इथे काम करताना तो आईलाही साथ देत असे. अचानक काही दिवसांपूर्वी दीपांशूला त्याच्या आईचे पाय मोडल्याची बातमी मिळाली. तिच्या उपचारासाठी पैसे लागणार होते. यानंतर दीपांशू रांचीच्या रिम्स जवळील एका खासगी रुग्णालयात पोहोचला आणि म्हणू लागला, की त्याला त्याची किडनी विकायची आहे. जेणेकरून त्याला त्याच्या आईवर उपचार करता येतील. त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत. रुग्णालयातील एक कर्मचारी रिम्सचे डॉ.विकास यांना ओळखत होता. सामाजिक कार्यासाठी सदैव पुढे असलेले डॉ. विकास न्यूरो सर्जरी विभागात आहेत. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. विकास म्हणाले की, बिहारच्या गया जिल्ह्यातून एक अल्पवयीन मुलगा आला होता. त्याला वडील नाहीत. तो RIMS जवळील एका खासगी रुग्णालयात आला आणि त्याने आईच्या उपचारासाठी आपली किडनी विकायची असल्याचं सांगितलं. तो खूप गरीब आहे. त्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने त्याची ओळख करून दिली. यानंतर डॉ.विकास यांनी त्याला आश्वासन दिलं, की आईला रिम्समध्ये घेऊन ये, त्यांच्यावर मोफत उपचार केले जातील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.