मुंबई, 07 जुलै: आजकालच्या काळात जे आणि जेवढं काम पुरुष करू शकतात तेच काम महिला (Women Empowerment) करू शकतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून इतकंच नाही तर त्यांच्यापेक्षा वरचढ काम महिला करू शकतात. जगात असं कोणतंही क्षेत्रं नाही ज्या क्षेत्रात महिला आघाडीवर नाहीत. अगदी फॅशन लाइफस्टाइल असो के विज्ञान सर्वच क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर आहेत. असाच एका महिलेचा जोखमीचं आणि स्किलफुल काम करतानाचा एक व्हिडिओ (Video of women working hard) भारतीय रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways, Government of India) त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ बघून प्रत्येक महिलेच्या मनात अभिमान आणि गर्व नक्की जागेल.
रेल्वे स्टेशनवर जेव्हा कोणत्याही रेल्वे गाडीला इंजिन लागतं त्याला कपलिंग म्हणतात. हे काम मॅन्युअल म्हणजे स्वतःच्या हातानी कोणत्याही मशीनद्वारे न करता करणं आवश्यक असतं. हे काम आतापर्यंत पुरुष कर्मचारी करत होते. मात्र या व्हिडीओत एक महिला कर्मचारी हे जोखमीचं आणि स्किलफुल काम करताना दिसून येत आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये
या व्हिडीओमध्ये एक महिला रेल्वे कर्मचारी इंजिन आणि रेल्वेच्या डब्यांना जोडण्याचं काम करताना दिसून येत आहे. यामध्ये ती एक लाल रंगाचा झेंडा तर एक हिरव्या रंगाचा झेंडा गाडीच्या लोको पायलटला दाखवतात दिसून येते आहे. रेल्वे इंजिन हे डब्यांना व्यवस्थित जोडलं जावं म्हणून ती लोको पायलटला दिशा दाखवताना दिसून येत आहे. इतकंच नाही तर यानंतर ती स्वतः रेल्वे रुळांवर उतरून इंजिन आणि कोच यामधील नट आणि बोल्ट्सला कसताना दिसून येते आहे. हे काम अतिशय जोखमीचं आहे. यामध्ये चूक झाल्यास मोठी अपघात घडू शकतो. मात्र आजकालची नारी शक्ती हे काम मोठ्या हुशारीने आणि योग्य रित्या करू शकते असं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे.
" #AatmanirbharBharat की आत्मनिर्भर नारी! नवीन भारताची महिला कारभार घेत आहे आणि लोकोमोटिव्ह आणि कोच यांच्यातील जोडणीची प्रक्रिया कुशलतेने पार पाडत आहे. " असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये भारतीय रेल्वे मंत्रालयाने म्हंटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.