मुंबई: गेल्या काही दिवसांपासून परदेशातील नंबरवरून फोन करून व्हॉट्सअॅप किंवा तुमचा फोन हॅक करण्याचे प्रकार सुरू आहेत. तुम्हाला जर असे अनोळखी नंबरवरून फोन येत असतील तर वेळीच सावध राहाणं गरजेचं आहे. याबाबत गृह मंत्रालयाने महत्त्वाच्या गाइडलाईन्स जारी केल्या आहेत. परदेशातून भारतातील नागरिकांना व्हॉट्सअॅपवर येणार्या अनोळखी किंवा निनावी कॉल्सवर गृह मंत्रालयाने कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर ऑर्गनायझेशन म्हणजेच I4C ने या नवीन ट्रेंडबाबत एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे.
Account एक पण फोन चार, पाहा कसं वापरता येणार Whatsapp, काय म्हणाले मार्क झुकरबर्गNumerous #WhatsApp users are receiving unwanted international calls. Users can block and report these numbers. Report any #cybercrime at https://t.co/pVyjABu4od and #Dial1930 in case of online financial fraud.#OnlineSafety #InternationalCalls #Trend #WhatsAppCall@WhatsApp #G20 pic.twitter.com/jaOFdUVOw4
— Cyber Dost (@Cyberdost) May 9, 2023
अशाप्रकारचे कोणतेही फोन नागरिकांनी उचलू नयेत त्यामुळे तुमचा डेटा हॅक केला जाऊ शकतो, तुमची फसवणूक होऊ शकते अशी सूचना देण्यात आली आहे. अशा प्रकारच्या कॉल्समुळे लोकांची आर्थिक फसवणूक होत आहे.
Whats App : व्हॉट्सअॅप युझर्ससाठी आनंदाची बातमी! आता कॉन्टॅक्ट एडिट आणि सेव्ह करणं होणार सोपंव्हिडीओच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या या अलर्टमध्ये असे नंबर तात्काळ ब्लॉक करून रिपोर्ट करावेत असं आवाहन केलं आहे. याशिवाय स्थानिक सायबर क्राईम युनिटला तत्काळ माहिती द्यावी. या फोनमुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं.