मुंबई : तुम्हाला Whatsapp एकावेळी एकाच फोनमध्ये वापरता येत होतं. फार तर एक फोन आणि लॅपटॉप असं वापरता येत होतं. मात्र एकाच नंबरवरील Whatsapp अकाउंट एकापेक्षा जास्त फोनमध्ये वापरण्याची परवानगी दिली जात नव्हती. आता तुम्ही एकपेक्षा जास्त फोनमध्ये एकाच नंबरने अकाउंट वापरू शकणार आहात. फेसबुक आणि Whatsapp चे मालक मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे.
🥁 Drumroll please...
— WhatsApp (@WhatsApp) April 25, 2023
Now you can use the same WhatsApp account on multiple phones 📱📞 ☎️ 📲
Link up to 4 other devices to your account so you can easily switch between phones without signing out and pick your chats up right where you left off. pic.twitter.com/Loqa30EgHk
व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच व्हॉट्सअॅप युजर्स चार फोनमध्ये एकचा अकाउंट वापरू शकणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत हे फीचर अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
जसं हे WhatsApp अकाउंट PC किंवा टॅबलेटवर चालवता तसंच इतर फोनमध्ये देखील चालवता येणार आहे. कंपनीने सध्या हे नवीन फीचर जाहीर केले असून येत्या काही दिवसांत उपलब्ध होईल असं ग्वाही दिली आहे.
Whatsapp ने केले मोठे बदल, तुमच्या मेसेजबद्दल घेतला मोठा निर्णय, काय आहे नवीन अपडेट?कंपनीने ब्लॉग लिहून याबाबत माहिती दिली आहे. युजर्सच्या मेसेजची गोपनीयता बाळगली जाणार आहे, तसेच त्यांचे सर्व फोटो आणि व्हिडीओ हे इतर डिव्हाइसवर देखील अॅक्सीस केले जाऊ शकतात असं यामध्ये म्हटलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार युजर त्यांचे WhatsApp खाते चार किंवा अतिरिक्त स्मार्टफोन्सशी लिंक करू शकतील आणि त्यांना दुय्यम डिव्हाइस अधिकृत करण्यासाठी फक्त प्राथमिक फोन वापरावा लागेल. ही प्रक्रिया WhatsApp वेब अधिकृत करण्यासारखीच आहे. युजर्सना QR कोड स्कॅन करणं आवश्यक आहे, पर्याय म्हणून OTP किंवा व्हेरिफिकेशन कोडची देखील सुविधा उपलब्ध असणार आहे.
Whats App : व्हॉट्सअॅप युझर्ससाठी आनंदाची बातमी! आता कॉन्टॅक्ट एडिट आणि सेव्ह करणं होणार सोपं मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. जेव्हा युजर्सची बॅटरी संपेल तेव्हा हे फीचर कामी येईल अशी आशा व्यक्त केली आहे. अशा वेळी तो त्याच्या मित्राच्या किंवा कलीगच्या डिव्हाइसवरून साइन इन करू शकतो.