कोरोनाशी लढण्यासाठी केंद्राने राज्यांना दिले 17287 कोटी, मिळणार SDRMF चा पहिला हप्ता

कोरोनाशी लढण्यासाठी केंद्राने राज्यांना दिले 17287 कोटी, मिळणार SDRMF चा पहिला हप्ता

देशावर ओढवलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटाला रोखण्यासाठी आता अर्थमंत्रालयानं राज्यांसाठी निधीची घोषणा केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 एप्रिल : देशावर ओढवलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटाला रोखण्यासाठी आता अर्थमंत्रालयानं राज्यांसाठी निधीची घोषणा केली आहे. अर्थमंत्रालयानं राज्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली. यामध्ये एकूण 17,287.08 कोटी रुपये केंद्राने दिले आहेत. यात 6,195.08 कोटी रुपये 15 वित्तीय आयोगाच्या रिव्हेन्यू डेफिसिट ग्रँटच्या अंतर्गत देण्यात आले आहेत. ही ग्रँट एकूण 14 राज्यांसाठी देण्यात आली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फंड दिल्यानंतर याबाबतची माहिती दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय, नागालँड, पंजाब, सिक्किम, तामिळनाडु, त्रिपुरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगला या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. या राज्यांना ग्रँटच्या अंतर्गत 6,195.08 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

याशिवाय स्टेट डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट फंडातून सर्व राज्यांना उर्वरित 11,092 कोटी रुपये देण्यात आले आहेत. अॅडव्हान्स म्हणून ही रक्कम देण्यात आली आहे. SDRMF अंतर्गत पहिली इन्स्टॉलमेंट म्हणून ही रक्कम दिली असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.

हे वाचा : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झाली 490; मुंबईत सर्वाधिक रुग्ण वाढले

देशात कालपासून 336 नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे देशातला कोरोनाग्रस्तांचा आकडा 2301 झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 56 मृत्यू देशभरात झाले आहेत. त्यातले 12 गेल्या 24 तासांतले आहेत. आतापर्यंत 157 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झालेले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. कोरोनाव्हायरचे महाराष्ट्रात आज दिवसअखेर 490 रुग्ण झाले आहेत. गेल्या 24 तासांत 67 नवे रुग्ण सापडले.

हे वाचा : Lockdown : नागपूरमधून तमिळनाडूला निघाला तरूण, तेलंगणात ह्रदयविकाराने मृत्यू

First published: April 3, 2020, 9:14 PM IST

ताज्या बातम्या