बंगळुरू, 19 जानेवारी: एकाच विमानतळाच्या धावपट्टीवरून (Airport Runway) एकाच वेळी दोन विमानांनी (Two Flights) उड्डाण केल्यामुळे (Take off) होणारी संभाव्य टक्कर (Mid air crash) अगदी थोडक्यात बचावली. बंगळुरू विमानतळावर 7 जानेवारी रोजी हा प्रकार घडला. विमानतळावरील दोन वेगवेगळ्या धावपट्ट्यांवरून एकाच वेळी दोन विमानांनी टेकऑफ केलं. त्यामुळे दोन्ही विमानं एकमेकांच्या अगदी जवळ आली होती आणि कुठल्याही क्षणी त्यांची एकमेकांशी टक्कर होण्याची शक्यता होती. मात्र आयत्या वेळी कर्मचाऱ्यांनी दोन्ही विमानाच्या पायलटना सावध केल्यामुळे हा प्रकार टळला.
एकाच वेळी दोन उड्डाणं
बंगळुरू विमानतळावर दक्षिण आणि उत्तर बाजूला धावपट्ट्या आहेत. या दोन्ही धावपट्ट्यांवरून कधीही एकाच वेळी उड्डाणं होत नाहीत. एक धावपट्टी ही टेकऑफसाठी वापरण्यात येते, तर दुसरी धावपट्टी लँडिंगसाठी वापरली जाते. एकाचवेळी दोन्ही धावपट्टीवरून उड्डाण झालं, तर विमानं एकमेकांसमोर येऊन टक्कर होण्याची शक्यता असल्यामुळेच हा नियम पाळण्यात येतो. मात्र 7 जानेवारीला दोन्ही धावपट्य्यांच्या यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव दिसल्यामुळे हा प्रसंग ओढवला आणि दोन्ही विमानांनी एकाच वेळी उड्डाण केलं.
अशी घडली घटना
7 जानेवारी या दिवशी उत्तरेची धावपट्टी ही टेकऑफसाठी आणि दक्षिणेची धावपट्टी लँडिंगसाठी वापरण्याचा निर्णय सकाळी घेण्यात आला होता. त्यानंतर दक्षिणेची धावपट्टी बंद करण्याचा निर्णय ड्युटीवर असणाऱ्या इन-चार्जने घेतला. मात्र या गोष्टीची कल्पना दक्षिणेच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला देण्यात आली नव्हती. त्यामुळे एअऱ ट्रॅफिक कंट्रोलकडून एकाच वेळी दोन्ही धावपट्टीवरील विमानांना उड्डाणाची परवानगी देण्यात आली.
हे वाचा -
थोडक्यात टळली टक्कर
यामुळे दोन्ही विमानांनी एकाच वेळी एकाच दिशेनं हवेत उड्डाण केलं. ही दोन्ही विमानं इंडिगो कंपनीची होती. उड्डाण केल्या केल्या ही बाब रडार कंट्रोलरच्या लक्षात आली आणि त्याने दोन्ही विमानाच्या पायलट्सना याची सूचना दिली आणि हा अपघात टळला. मात्र कर्मचाऱ्यांच्या सिली मिस्टेकमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण धोक्यात आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airplane, Airport, Bengaluru, Crash, Domestic flight