मध्य प्रदेश सरकारनं मेट्रोसंदर्भात एक विशेष घोषणा केली आहे. राजधानी भोपाळसह इतर मोठी शहरं मेट्रो नेटवर्कशी जोडण्याची योजना आखली आहे.
इंदूर-भोपाळसह जबलपूर-ग्वाल्हेर आणि उज्जैनमध्ये ब्रॉडगेज मेट्रो नेटवर्क तयार केले जाईल. भविष्यातील वाहतूक आणि सामान्य जनतेच्या गरजा लक्षात घेऊन सरकार वाहतुकीसंदर्भात नवीन पावले उचलत आहे.
सध्या भोपाळ आणि इंदूरमध्ये मेट्रोचं काम सुरू आहे. पण आता सरकारने एक पाऊल पुढे टाकत उज्जैन आणि जबलपूर या शहरांना मेट्रोशी जोडण्याची योजना तयार केली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या प्रकल्पाबाबत केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी याविषयी चर्चा केली आहे.
मध्य प्रदेशातील मेट्रोसाठी तीन टप्प्यांच्या कृती आराखड्यावर काम सुरू आहे, ज्यामध्ये भोपाळ ते इंदूर या ब्रॉडगेज मेट्रोचे काम पहिल्या टप्प्यात सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यात मेट्रो उपग्रह टाऊनशिप पर्यंत मेट्रो चालवण्याची योजना आहे.