• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • किंकाळ्या आणि घाबरगुंडी! भर रस्त्यात अवतरला 8 फुटी साप, गाड्या सोडून पळाले लोक आणि मग...

किंकाळ्या आणि घाबरगुंडी! भर रस्त्यात अवतरला 8 फुटी साप, गाड्या सोडून पळाले लोक आणि मग...

रहदारीच्या भर रस्त्यात साप आल्यानंतर घाबरगुंडी (Mess at crowded road due to 8 feet snake) उडाल्यामुळे नागरिक सैरावैरा धावू लागले आणि ट्रॅपिक जॅम झालं.

 • Share this:
  लखनऊ, 8 ऑक्टोबर : रहदारीच्या भर रस्त्यात साप आल्यानंतर घाबरगुंडी (Mess at crowded road due to 8 feet snake) उडाल्यामुळे नागरिक सैरावैरा धावू लागले आणि ट्रॅपिक जॅम झालं. रस्त्यावर रहदारी असताना अचानक तिथे भलामोठा 8 फुटी साप दिसला. ते पाहून काही वाहनधारकांनी (Vehicles stopped and parked on road) करकचून ब्रेक लावले आणि साप काय करतो, ते थांबून पाहायला सुरुवात केली. त्यानंतर साप ज्या ज्या दिशेला जाईल, त्या त्या दिशेने (People were screaming in fear) नागरिक किंकाळ्या फोडून आरडाओरडा करू लागले. भर रस्त्यात किंकाळ्या उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये सिटी मार्केट परिसरात अचानक 8 फुटी साप दिसला. हा साप पाहण्यासाठी काही वाहनधारक जागीच थांबले. मात्र साप हा वाहनांच्या दिशेला येऊ लागला आणि काही दुचाकींमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू लागला.  त्यामुळे अनेक वाहनचालक आपापल्या गाड्यांवरून खाली उतरले, गाड्या स्टँटवर उभ्या केल्या आणि तिथून पळून गेले. भर चौकात गाड्या उभ्या राहिल्यामुळे मागच्या गाड्याही खोळंबल्या आणि ट्रॅफिक जॅम झालं. सापाला पाहून घाबरले लोक एवढा मोठा साप पाहून लोक केवळ घाबरलेच नाहीत, तर त्यांनी किंकाळ्या फोडायला सुरुवात केली. आपल्या अंगावर साप येऊ नये, म्हणून नागरिक एकमेकांना धक्का देत तिथून लांब पळत असल्याचं चित्र दिसलं. त्यामुळे ऐन चौकात चांगलीच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. हे वाचा - शाळेनं मुलीला दिली 300 उठाबशा काढण्याची शिक्षा, आयुष्यभरासाठी आलं अपंगत्व सापाला सोडलं जंगलात अखेर काही सर्पमित्रांनी घटनास्थळी दाखल होत सापाला पोत्यात घातलं आणि जंगलात नेऊन सोडलं. सापाला पोत्यात घालून नेताना पाहिल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर काही तासांनी चौकातील ट्रॅफिक क्लिअर झालं. शहरात या सापाची जोरदार चर्चा दिवसभर रंगली होती.
  Published by:desk news
  First published: