• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • 'पतीला टक्कल पडलं ते पती माझं ऐकत नाही...', जोडप्याच्या भांडणांच्या या तक्रारी वाचून माराल कपाळावर हात

'पतीला टक्कल पडलं ते पती माझं ऐकत नाही...', जोडप्याच्या भांडणांच्या या तक्रारी वाचून माराल कपाळावर हात

पती-पत्नीमधील भांडणांची ही कारणं वाचून तुम्हालाही धक्का बसेल. हेही काय भांडणाचे कारण आहे का, असाच प्रश्न तुम्हालाही पडू शकतो.

 • Share this:
  मेरठ, 15 मार्च : उत्तर प्रदेशात मेरठच्या पोलीस कुटुंब सल्ला आणि तक्रार निवारण केंद्रात एकाहून एक रंजक प्रकरणं दाखल होत असतात. लहान-लहान गोष्टींवरून घटस्फोट मागणारे आणि तक्रारी घेऊन येणारी जोडपी इथं दिसतात. (meerut news) आज तकनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. या केंद्रात जोडप्यांचं निशुल्क समुपदेशन केलं जातं. या केंद्राच्या मते आजवर 2500 ते 3000 कौटुंबिक वादांचं निवारण केलं गेलं आहे. या केंद्राच्या अधिकारी मोनिका जिंदल मागच्या दीड वर्षांपासून केंद्राचं काम पाहतात. त्यांचं म्हणणं आहे, की पती पत्नी दोघांनाही आपलं म्हणणं सांगण्यासाठी वेळ पाहिजे असतो. (reasons for wife and husband disputes) मात्र जिंदाल यांच्याकडे आजवर एकाहून एक अजब कारणं घेऊन आलेली जोडपी आहेत. जाणून घ्या त्यातीलच काही जोडप्यांच्या कथा (divorce cases at meerut police station) पूर्वी केस कुरळे होते आता नाहीत इथं लग्नानंतर एका वर्षानं पत्नीला कळालं की पतीच्या कुरळ्या केसांनी भारावून जात तिनं लग्न केलं होतं. पण आता मात्र ते कुरळे राहिले नाहीत. आता हेच कारण घेऊन पत्नी केंद्रात आली. तिच्या म्हणण्यानुसार, जेव्हा सोयरीक झाली होती तेव्हा नवऱ्याच्या डोक्यावर अतिशय घनदाट, कुरळे केस होते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला पाहूनच लग्न केलं होतं. (meerut police Monica jindal solves marriage disputes) हेही वाचा 'कोरोना वुहानच्या लॅबमधून नाही पण...'; चीनला गेलेल्या WHO च्या टीमचा मोठा खुलासा मात्र पत्नीच्या म्हणण्यानुसार लग्नाच्या काही काळ सगळं चांगलं सुरू होतं मात्र नंतर पतीच्या डोक्यावरचे केस गळू लागले. आता त्याला पूर्ण टक्कल पडलं आहे. म्हणून तिला त्याच्यासोबत राहायचं नाही. हे प्रकरण केंद्रात पोचल्यावर जोडप्याचं चांगलं समुपदेशन केलं गेलं. आता प्रकरणातली गुंतागुंत संपली आहे. पती सोबत सेल्फी घेत नाही या केंद्राकडे अजून एक तक्रार आली. ती म्हणजे, पत्नीची तक्रार आहे, की पती सोबत सेल्फी घेत नाही. आता याच कारणामुळं पत्नीनं घटस्फोट मागितला. पतीनं मात्र तिचा हा आरोप चुकीचा असल्याचं सांगितलं. त्यानं पत्नीसोबतच्या काही सेल्फी केंद्राच्या अधिकाऱ्यांना दाखवल्या. इथं दोघांचंही समुपदेशन केलं गेलं. आता पती-पत्नी सोबत राहतात. हेही वाचा त्सुनामीत हरवली बायको; शेवटच्या मेसेजमुळे 10 वर्षे नवऱ्यानं धुंडाळला समुद्र पती पूर्वी माझं ऐकायचा आता ऐकत नाही   अजून एका प्रकरणात पत्नीचं म्हणणं होतं, की पतीसोबत तिचा प्रेमविवाह झाला. दोघांना एक मुलगी आहे. पत्नीची तक्रार आहे, की लग्नाआधी पती सगळ्या गोष्टी ऐकायचा. आता लग्नानंतर त्याचं धोरण बदललं. आता दोघांमध्ये भांडणं होतात. या प्रकरणात पती-पत्नीचं समुपदेशन करण्यात आलं. शेवटी पती-पत्नी दोघेही राजी झाले. आता दोघे आनंदात राहतात. मोनिका जिंदल सांगतात, की पती-पत्नीचं नातं खूप नाजूक असतं. हे दोन चाकांप्रमाणं असतं ज्यातून संसाराचा गाडा चालतो. पती-पत्नीला मानसशास्त्राच्या सगळ्या पैलूंना विचारात घेऊन समजावलं जातं. सोबत एकमेकांना समजून घेण्याचाही सल्ला दिला जातो. मोनिका हेसुद्धा म्हणतात, की नव्या पिढीमध्ये संयम आणि सहनशक्ती कमी आहे. लहानसहान गोष्टींमुळं त्यातूनच वाद होतात. शिवाय विभक्त कुटुंबात कुणीच वडिलधारं समाजवण्यास नसतं. त्यातून समस्या वाढतात. मात्र इथं पती-पत्नी आल्यावर त्यांची भांडणं सोडवून मोठंच आत्मिक समाधान मिळतं.
  Published by:News18 Desk
  First published: