जाहिरात
मराठी बातम्या / देश / Tomato Price Hike : टोमॅटोच्या महागाईचा मॅक्डोनाल्ड्सलाही फटका, मेनूमधून टोमॅटो गायब

Tomato Price Hike : टोमॅटोच्या महागाईचा मॅक्डोनाल्ड्सलाही फटका, मेनूमधून टोमॅटो गायब

टोमॅटोच्या महागाईचा 'मॅक्डोनाल्ड्स' लाही फटका, मेनूमधून टोमॅटो गायब

टोमॅटोच्या महागाईचा 'मॅक्डोनाल्ड्स' लाही फटका, मेनूमधून टोमॅटो गायब

सध्या देशभरात टोमॅटोच्या वाढलेल्या भावाचा फटका आता मॅक्डोनाल्ड्स या फास्टफूड जॉईंटला देखील बसला आहे. टोमॅटोचे वाढणारे भाव लक्षात घेऊन मॅक्डोनाल्ड्सने त्यांच्या मेनू संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    ‘मॅक्डोनाल्ड्स इंडिया’ने (नॉर्थ अँड ईस्ट) नुकतंच असं जाहीर केलं आहे, की त्यांच्या मेनूमध्ये तात्पुरत्या स्वरूपात टोमॅटोचा समावेश केला जाणार नाही. हंगामी समस्यांमुळे टोमॅटो खरेदीत अडचण येत असल्याचं कारण कंपनीने दिलं आहे. टोमॅटोच्या किमती वाढत असल्यामुळे हे पाऊल उचलत असल्याचं कंपनीने थेट जाहीर केलं नसलं, तरी भारतात सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या दरांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. पावसाळी हंगामातल्या आव्हानांमुळे टोमॅटोची पुरवठा साखळी, वाहतूक आणि दर्जा या सगळ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. दिल्ली, कोलकाता, उत्तर प्रदेश यांसारख्या शहरांमध्ये टोमॅटोचे दर प्रति किलो 130 ते 155 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. ‘मॅक्डोनाल्ड्स इंडिया’च्या (नॉर्थ अँड ईस्ट) प्रवक्त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं आहे, की खाद्यपदार्थांचा दर्जा आणि सुरक्षितता उच्च प्रतीची राखण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे. खूप प्रयत्न करूनही कंपनीला जसे हवेत तसे उत्तम दर्जाचे टोमॅटोज मिळू शकलेले नाहीत. त्यामुळे पदार्थांमधून टोमॅटो वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, ही तात्पुरती समस्या असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आणि टोमॅटो पुन्हा समाविष्ट करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न सुरू असल्याचंही सांगण्यात आल्याचं ‘सीएनबीसी-टीव्ही18’च्या वृत्तात म्हटलं आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    ‘मॅक्डोनाल्ड्स इंडिया’च्या (नॉर्थ अँड ईस्ट) प्रसिद्धीपत्रकात असं म्हटलं आहे, की ‘आमचा ब्रँड खाद्यपदार्थांचा उच्च दर्जा आणि सुरक्षिततेशी कटिबद्ध आहे. घटक पदार्थांच्या दर्जाची कसून तपासणी केल्यानंतरच आम्ही त्यांचा वापर करतो; मात्र सध्याच्या हंगामी समस्यांमुळे आम्हाला अनेक प्रयत्न करूनही चांगल्या दर्जाचे टोमॅटो उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे आमच्या काही रेस्टॉरंट्सच्या खाद्यपदार्थांत आम्ही टोमॅटोचा वापर करू शकत नाही. ही तात्पुरती समस्या असून, पुन्हा टोमॅटोचा वापर करण्याच्या दृष्टीने शक्य ते सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत.’ सध्या सर्वच भाज्यांचे आणि खासकरून टोमॅटोचे दर संपूर्ण उत्तर भारतात कमालीचे वाढले आहेत. दिल्लीतल्या काही मार्केट्समध्ये एक किलो टोमॅटोसाठी 129 रुपये मोजावे लागत आहेत. उत्तर प्रदेशातल्या मोरादाबादमध्ये दीडशे रुपये प्रति किलो दराने टोमॅटो विकले जात आहेत, असं एएनआया वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलं आहे. झारखंड राज्यातही टोमॅटोचे दर वाढले असून, दरांमधली ही वाढ दक्षिणेकडच्या राज्यांत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे असू शकते, असा अंदाज आहे. गेल्या आठवड्यात टोमॅटोच्या किरकोळ विक्रीचे दर 100 ते 120 रुपये प्रति किलो एवढे होते. Besan For Skin : चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी बेसनपीठ लावताय? आत्ताच थांबा, अन्यथा त्वचेचे होईल भयंकर नुकसान या परिस्थितीवर मात करण्यासाठी तमिळनाडू सरकारने पावलं उचलली आहेत. चेन्नईत रेशन दुकानांमध्ये प्रति किलो 60 रुपये दराने टोमॅटो विकले जातील, अशी घोषणा सरकारने केली आहे. इतर राज्यांतून होणारा टोमॅटोचा पुरवठा घटणं हे किंमतवाढीमागचं कारण असल्याचं सहकारमंत्री के. आर. पेरियाकरुप्पन यांनी मंत्रालयात बैठकीत सांगितलं. ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, मेट्रो सिटीजमध्ये टोमॅटोच्या किमतींमध्ये फरक आहे. कोलकात्यात 152 रुपये, दिल्लीत 120 रुपये, चेन्नईत 117 रुपये, तर मुंबईत 108 रुपये प्रति किलो दराने टोमॅटो विकले जात आहेत. पुरवठा आणि मागणीत होणारा बदल आणि बाजाराची परिस्थिती यांनुसार टोमॅटोच्या किमती वेगवेगळ्या असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. एका वृत्तपत्राने म्हंटले आहे की, की आज एका टोमॅटोची किंमत जेवढी आहे, त्या किमतीत काही महिन्यांपूर्वी किलोभर टोमॅटो मिळत होते. देशभर टोमॅटोच्या किमती वाढण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. मान्सूनला झालेला उशीर, कमी उत्पादन आणि अति उन्हाळा यांमुळे टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे टोमॅटोचे दर झपाट्याने वाढले. येत्या काही दिवसांत टोमॅटोचे प्रति किलो दर 200 रुपयांचा टप्पा गाठू शकतात, असा अंदाज मुंबईतल्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे. खरीप हंगामातले टोमॅटो केव्हा बाजारात येतात, त्यावर नजीकच्या भविष्यात टोमॅटोचे दर केव्हा घटणार हे अवलंबून आहे, असं इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटलं आहे. आत्ता कुठे मान्सूनला सुरुवात झाली असल्याने टोमॅटो रोपांची पुनर्लागवड सुरू झाली आहे. त्यामुळे ऑगस्टच्या मध्यापूर्वी हे टोमॅटो बाजारात येण्याची शक्यता नाही. तोपर्यंत टोमॅटोचा पुरवठा मर्यादित असल्याने चढे दर कायम राहण्याची शक्यता आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात