तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्वचेची ऍलर्जी असल्यास त्वचेवर बेसन पीठ लावणे टाळा. अन्यथा वेळेवर बेसनपीठ लावणे टाळले नाही तर त्वचेवर भयंकर परिणाम होऊ शकतात.
सेंसिटिव्ह त्वचेवर जर बेसन पीठ लावले तर त्वचेवर पिंपल्स येण्याचं प्रमाण वाढू शकत. सेंसिटिव्ह त्वचेवर बेसनपीठ लावल्यास त्वचेला जळजळ होते आणि लाल चट्टे उठू लागतात.
बेसन त्वचेवरील ओलावा शोषून घेतो. ज्यामुळे तुमची त्वचा सोलवटू शकते. तेव्हा अधिकतर ड्रायस्किन असलेल्या लोकांनी त्वचेवर बेसनपीठ लावणे टाळावे.