मराठी बातम्या /बातम्या /देश /

MCD Election Result 2022: आपकडून भाजपच्या 15 वर्षाच्या सत्तेला सुरुंग; पण, या जागेवरील पराभव जिव्हारी

MCD Election Result 2022: आपकडून भाजपच्या 15 वर्षाच्या सत्तेला सुरुंग; पण, या जागेवरील पराभव जिव्हारी

आपकडून भाजपच्या 15 वर्षाच्या सत्तेला सुरुंग

आपकडून भाजपच्या 15 वर्षाच्या सत्तेला सुरुंग

MCD Election Result 2022 : दिल्ली सरकारमधील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व 4 प्रभागांमध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यापूर्वी मंत्री सत्येंद्र जैन यांच्या भागातील सर्व 3 प्रभागात भाजपने बाजी मारली होती.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 7 डिसेंबर : दिल्ली महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जवळपास लागले आहेत. आम आदमी पार्टी 122 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भारतीय जनता पक्ष 107 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला दुहेरी आकडाही स्पर्श करता आलेला नाही. या निवडणुकीत भाजपच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला गेला असला तरी काही ठिकाणचे पराभव आपच्या चांगलेच जिव्हारी लागले आहेत.

आम आदमी पक्षाचे मजबूत नेते आणि दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारमधील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे पटपरगंज विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्या परिसरात एकूण 4 वॉर्ड आहेत. या सर्व प्रभागात भाजपच्या उमेदवारांनी आपच्या उमेदवारांचा पराभव केला. प्रभाग 196 मयूर विहार-2 मध्ये भाजपचे उमेदवार बिपीन बिहारी विजयी झाले आहेत. दुसरीकडे, भाजपच्या रेणू चौधरी यांनी आपच्या उमेदवाराचा पराभव करत 197-पतपरगंजवर कब्जा केला आहे. याशिवाय 198-विनोद नगरमधून भाजपचे रविंदर सिंग नेगी आणि 199-मंडवली प्रभागातून भाजपच्या शशी चंदना यांनी आपच्या उमेदवारांवर विजय नोंदवला आहे.

याआधी आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सत्येंद्र जैन यांचा मतदारसंघ असलेल्या शकूर बस्तीतील तीनही प्रभाग भाजपने जिंकले होते. शकूर बस्ती विधानसभा मतदारसंघातील सरस्वती विहार वॉर्ड क्रमांक 58 मधून भाजप उमेदवार शिखा भारद्वाज यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवार उर्मिला गुप्ता यांचा पराभव केला आहे. तर पश्चिम विहार प्रभाग-59 मधून भाजपच्या विनीत वोहरा यांनी शालू दुग्गल यांचा पराभव केला आहे. याशिवाय राणीबाग प्रभाग 60 मधून ज्योती अग्रवाल यांनी आप उमेदवार मिथलेस पाठक यांचा पराभव केला आहे. सत्येंद्र जैन सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तिहार तुरुंगात आहेत.

वाचा - गुजरातमध्ये आप दाखवणार का करामत? एग्झिट पोलमधून धक्कादायक निकाल

गोपाल राय यांच्या परिसरात टक्कर सुरूच

बाबरपूर हा केजरीवाल सरकारमधील मंत्री गोपाल राय यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. या विधानसभा मतदारसंघात एकूण 4 प्रभाग आहेत. आम आदमी पक्षाकडून रेखा त्यागी आणि काँग्रेसकडून नजरा बेगम रिंगणात आहेत. दुसरीकडे भाजपने यावेळी सुभाष मोहल्लामधून मनीषा सिंह यांना उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत येथे आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपने कबीर नगरमधून विनोद कुमार यांना उमेदवारी दिली आहे तर आपकडून साजिद आहात.

काँग्रेसने कबीर नगरमधून झरीफ यांना तिकीट दिले आहे. येथे काँग्रेसची आघाडी कायम आहे. गोरख पार्कमधून भाजपच्या तिकीटावर कुसुम तोमर यांना आपच्या प्रियंका सक्सेना आणि काँग्रेसच्या आरती आव्हान देत आहेत. आप इथे आघाडीवर आहे. कर्दम पुरीमधून भाजपचे मुकेश बन्सल, आपचे मुकेश यादव आणि काँग्रेसचे संजय गौर यांच्यात लढत आहे. येथे भाजपचे उमेदवार पुढे आहेत.

First published:

Tags: AAP, Arvind kejriwal, Delhi