मराठी बातम्या /बातम्या /देश /पॅकेजिंग यूनिटला भीषण आग; पाचव्या मजल्यावरून मजुरांनी मारल्या उड्या, थरारक VIDEO

पॅकेजिंग यूनिटला भीषण आग; पाचव्या मजल्यावरून मजुरांनी मारल्या उड्या, थरारक VIDEO

सोमवारी सकाळी सुरतमधील GIDC परिसरात एका पॅकेजिंग कंपनीला भीषण आग (massive fire at GIDC area of surat) लागल्याची माहिती समोर आली आहे.

सोमवारी सकाळी सुरतमधील GIDC परिसरात एका पॅकेजिंग कंपनीला भीषण आग (massive fire at GIDC area of surat) लागल्याची माहिती समोर आली आहे.

सोमवारी सकाळी सुरतमधील GIDC परिसरात एका पॅकेजिंग कंपनीला भीषण आग (massive fire at GIDC area of surat) लागल्याची माहिती समोर आली आहे.

सूरत, 18 ऑक्टोबर: सोमवारी सकाळी सुरतमधील GIDC परिसरात एका पॅकेजिंग कंपनीला भीषण आग (massive fire at GIDC area of surat) लागल्याची माहिती समोर आली आहे. सुरतच्या कडोदरा परिसरातील वरेली येथील एका पॅकेजिंग युनिटमध्ये ही आग लागली. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू (1 Worker death) झाला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न करत असून बचाव दलाने आतापर्यंत 100 हून अधिक कामगारांची सुखरुप सुटका केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरतच्या कडोदरा भागातील वरेली येथील पॅकेजिंग युनिटमध्ये नेहमीप्रमाणे काम सुरू होतं. अनेक कामगार कंपनीच्या पाचव्या मजल्यावर काम करत होते. दरम्यान, अचानक पाचव्या मजल्याला आग लागली. ज्वाळा वाढत असल्याचं पाहून कामगार घाबरले. काही मजूर इतके घाबरले की, त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी थेट पाचव्या मजल्यावरून उड्या मारण्यास सुरुवात (workers jump from 5th floor) केली. या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला आहे.

पॅकेजिंग युनिटमध्ये आग लागल्याची माहिती मिळल्यानंतर, घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी हायड्रोलिक लिफ्टद्वारे कामगारांची सुटका केली आहे. आतापर्यंत पॅकेजिंग युनिटमधून शंभरहून अधिक लोकांना वाचवण्यात आलं आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत माहिती देताना सूरतचे एसडीएम केजी वाघेला यांनी एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, आग लागल्यानंतर संबंधित कामगाराने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली होती. यातच त्याचा मृत्यू झाला आहे.

First published:
top videos

    Tags: Fire, Gujrat