भोपाळ, 16 जानेवारी : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) शिवपुरी येथे सख्ख्य़ा काकाने 6 वर्षांच्या पुतणीवर बलात्कार (Minor Rape) केला आणि यानंतर तिची हत्या (Murder) केली. हत्येनंतर काकाने केलेला प्रताप पाहून गावात खळबळ उडाली. या घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 14 जानेवारीपासून ही चिमुरडी बेपत्ता होती. आरोपीने मुलीचा गळा दाबल्यानंतर तिचा मृतदेह घरात गहू साठवण्याच्या जागेवर लपवून ठेवला होता. मिळालेल्या माहितीनुसार, 14 जानेवारी रोजी मुलीची हत्या करण्यात आली होती. मृत मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, 14 तारखेला गावापासून जवळ संक्रातीची जत्रा होती. येथे अनेक गावकरी गेले होते. जेव्हा मुलगी घरात दिसली नाही तर कुटुंबीयांना वाटलं ती जत्रेत गेली असेल. मात्र रात्रीपर्यंत मुलगी घरी परतली नाही. त्यानंतर शोधाशोध सुरू झाली. 15 जानेवारी रोजी मुलीच्या आजीला गहू साठवणूक करीत असलेल्या जागेवर मुलीचा मृतदेह दिसला. आणि नेमका प्रकार समोर आला. हे ही वाचा-नागपूर: सासू-सुनेच्या वादात चिमुकल्याचा हकनाक बळी, जन्मदातीनेच दिला भयंकर मृत्यू मुलीच्या काकानेच हे कृत्य केल्याचं समोर आलं. मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी दिल्यानंतर तिच्यावर आधी बलात्कार झाल्याचं उघड झालं. मुलीच्या काकानेच हे कृत्य केलं होत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh, Rape