Home /News /national /

'हिंदू मुलासोबत मुस्लीम मुलीचं लग्न कायदेशीर नाही', हायकोर्टाचा निर्णय

'हिंदू मुलासोबत मुस्लीम मुलीचं लग्न कायदेशीर नाही', हायकोर्टाचा निर्णय

मुस्लीम मुलीनं (Muslim Girl) हिंदू मुलासोबत (Hindu Boy) केलेलं लग्न वैध मानले जाऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने ( Punjab and Haryana high court) दिला आहे

    चंदीगड, 13 मार्च : मुस्लीम मुलीनं (Muslim Girl) हिंदू मुलासोबत (Hindu Boy) केलेलं लग्न वैध मानलं जाऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने ( Punjab and Haryana high court) दिला आहे. अर्थात, ते दोघे जण सज्ञान असतील तर परस्पर सहमतीनं संबंधामध्ये ( live in relationship) राहू शकतात असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. एका 25 वर्षाचा हिंदू मुलगा आणि 18 वर्षाची मुस्लीम मुलगी या दोघांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टानं हा निर्णय दिला आहे. काय आहे प्रकरण? भिन्न धर्मीय तक्रारदार जोडप्याने 15 जानेवारी रोजी शंकराच्या मंदिरामध्ये हिंदू पद्धतीप्रमाणे लग्न केलं होतं. या दोघांच्या जीवाला त्यांच्या कुटुंबीयांपासून धोका आहे. त्यामुळे त्यांनी अंबाला येथील पोलीस अधिक्षकांना सुरक्षा देण्याची विनंती केली होती. पोलीस अधिक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे या जोडप्याने हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने या निर्णयावरील सुनावणी करताना सांगितलं की, 'मुस्लीम मुलगी आणि हिंदू मुलाचा विवाह कायद्याच्या दृष्टीने वैध नाही. हा विवाह वैध ठरण्यासाठी मुलीनं धर्मांतर करुन हिंदू धर्म स्वीकारला पाहिजे. या प्रकरणात मुलीनं धर्मांतर केलेलं नाही. त्यामुळे हे लग्न हिंदू विवाह अधिनियमच्या अन्वये (Hindu marriage act) अवैध आहे. अर्थात याचिकाकर्ते हे सज्ञान आहेत. त्यामुळे ते परस्पर संमतीने एकमेकांशी संबंध ठेवू शकतात, असंही हायकोर्टाने स्पष्ट केलं. ( वाचा : 'डोक्याला बाम लावण्याची वेळ आली' हायकोर्टाच्या निर्णय लेखनावर सुप्रीम कोर्टाची नाराजी ) दरम्यान, याचिकाकर्त्याने मागणी केल्याप्रमाणे त्यांना तात्काळ सुरक्षा देण्यात यावी असे निर्देश देखील हायकोर्टाने यावेळी दिले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: India, Marriage, Relationship

    पुढील बातम्या