हैद्राबाद, 31 मे : माओवाद्यांचा सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचा डाव फसला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली आहे. कारण, आंध्रप्रदेश – ओरीसा सीमेवर सुरक्षा दलांवर हल्ला करण्याची योजना माओवाद्यांनी आखली होती. विशाखापट्टणम जिल्ह्याच्या हद्दीमध्ये असलेल्या नुरमतीच्या जंगलामध्ये 4 ठिकाणी दहशतवाद्यांनी प्रत्येक अर्ध्या किलोमीटर अंतरावर दहा – दहा किलोचे भुसुरूंग स्फोटकं पेरून ठेवली होती. पण, पोलिसांच्या तपासणीमध्ये माओवाद्यांचा सारा प्लॅन उघड झाला. त्यानंतर स्फोटकं निकामी करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे याच मार्गावरून पोलिसांचे पथक हे पायी जाणार होते. त्यांना लक्ष्य करण्याचा डावा हा माओवाद्यांचा होता. पण, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा डाव फसला आहे. यापूर्वी देखील भुसुरूंग स्फोटाद्वारे माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ले केलेले आहेत. भाजप नेत्याची हत्या; झोपेत असताना केला हल्ला यापूर्वी देखील झाला होता हल्ल्याचा प्रयत्न यापूर्वी 22 मे रोजी देखील छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात अरनपूर ते निलवायाच्या रस्त्यावर सुरक्षा दलाच्या ताफ्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न माओवाद्यांनी केला होता. यावेळी माओवाद्यांनी भुसुरूंग स्फोटाद्वारे दोन ठिकाणी IED बॉम्ब पेरून ठेवले होते. पण, सीआरपीएफच्या जवानांनी त्या मार्गावरून जाण्यापूर्वी IED बॉम्ब निष्क्रिय केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती.
15 जवान झाले होते शहीद तर, 1 मे रोजी देखील माओवाद्यांनी भुसूरूंग स्फोट घडवून आणला होता. त्यामध्ये 15 जवान शहीद झाले होते. 1 मे रोजी पोलिसांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर माओवाद्यांनी भूसुरुंग स्फोटानं हल्ला केला होता. माओवाद्यांनी 25 एप्रिल पुर्वीपासून या हल्ल्याची तयारी सुरू केली होती. तर, जवानांवर हल्ला करून जवानांच्या मृत्यूची खात्री केल्यानंतर माओवादी घनदाट जंगलात पसार झाले होते. सी 60 जवानांवर हल्ला करताना या परिसरात 150 पेक्षा जास्त माओवादी होते. स्फोट होताच जवानांच्या मृत्यूची खात्री करून माओवादी पसार झाले होते. बीडमध्ये EVM बाबत धनंजय मुंडेंचा धक्कादायक दावा, पाहा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







