मुंबईत कोरोनाग्रस्त 29 वर्षीय तरुणीची आत्महत्या, रुग्णालयातच घेतला गळफास

मुंबईत कोरोनाग्रस्त 29 वर्षीय तरुणीची आत्महत्या, रुग्णालयातच घेतला गळफास

पहाटे 3 वाजून 49 मिनिटांनी रुग्णालयातील बाथरुममध्ये या तरुणीनं गळफास घेतला. 7 दिवसांपासून नायर रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते.

  • Share this:

अमित राय (प्रतिनिधी) मुंबई, 15 एप्रिल: मुंबईत कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत असतानाच धक्कादायक बातमीमुळे खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री कोविड-19 पॉझिटिव्ह असणाऱ्या तरुणीनं गळफास लावून आपलं आयुष्य संपवल्यानं रुग्णालयात खळबळ उडाली. मुंबईतील नायर रुग्णालयात या 29 वर्षीय तरुणीवर उपचार सुरू होते. पहाटे 3 वाजून 49 मिनिटांनी रुग्णालयातील बाथरुममध्ये या तरुणीनं गळफास घेतला. 7 दिवसांपासून नायर रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. कोरोनाची लक्षण दिसत असल्यानं नायर रुग्णालयात टेस्ट करण्यात आल्या. या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं भीतीनं तरुणीनं आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाचा संसर्ग मुंबईत दिवसेदिवस वेगानं वाढत आहे. 1 हजारहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही तरुणी वरळीतील जिजामात नगर परिसरात राहात होती. कोरोनाच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. 7 व्या दिवशी म्हणजेच मंगळवारी तिथे रुग्णालयाच्या बाथरुममध्ये ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या तरुणीच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

हे वाचा-लॉकडाऊनसाठी नवी नियमावली जाहीर; 'या' सेवांना दिल्या सवलती, तर ट्रेन बंदच राहणार

मुंबईत कोरोनाचा धोका वाढला....

बईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आशिया खंडात सर्वात मोठी झोपडपट्टी ठरलेल्या धारावीमध्ये आज आणखी 5 नवे रुग्ण सापडले आहे. तर दादर परिसरातही 2 रुग्ण आढळले आहे. कोरोनाचं व्हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आज सकाळी धारावीत नवे पाच रुग्ण सापडले आहे. हे पाचही जण मुकुंदनगरमध्ये सापडले आहे.

हे वाचा-सावधान! 3 मेपर्यंत 'या' 13 सेवा राहणार बंद, वाचा संपूर्ण यादी

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 15, 2020, 12:23 PM IST

ताज्या बातम्या