जाहिरात
मराठी बातम्या / देश / पाण्यासारखा खर्च होणाऱ्या निवडणुकीत 1 रुपयाचीही संपत्ती नसलेला उमेदवार! राष्ट्रवादीने दिलं तिकीट

पाण्यासारखा खर्च होणाऱ्या निवडणुकीत 1 रुपयाचीही संपत्ती नसलेला उमेदवार! राष्ट्रवादीने दिलं तिकीट

पाण्यासारखा खर्च होणाऱ्या निवडणुकीत 1 रुपयाचीही संपत्ती नसलेला उमेदवार! राष्ट्रवादीने दिलं तिकीट

Manipur Assembly Election 2022: कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाच्या (Political Party) तिकिटावर निवडणूक लढवणे हे सोपे काम नाही. ही बाब कोणापासून लपून राहिलेली नाही, अनेक उमेदवार पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी पैसेही देतात. निवडणुकीच्या प्रचारात पाण्यासारखा पैसा वाया जातो. मात्र, या जमान्यातही प्रामाणिकपणे निवडणूक लढणारे काही नेते आहेत. मणिपूरमधील अशाच एका उमेदवाराची चर्चा जोरात सुरू आहे, ज्यांच्याकडे एक रुपयाचीही मालमत्ता नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

सेकमाई, 21 फेब्रुवारी : निवडणूक म्हटलं की पाण्यासारखा पैसा खर्च होताना दिसतो. उमेदवारांकडे असलेली कोट्यवधी रुपयांची संपत्ती जगजाहीर होते. मात्र, मणिपूर राज्यात एका उमेदवाराने त्याच्याकडे शून्य संपत्ती असल्याचे सांगितले आहे. सेकमाई मतदारसंघ (Sekmai Constituncy)ही मणिपूर राज्यातील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेली एकमेव विधानसभा जागा आहे. या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) 26 वर्षीय निंगथौजम पोपीलाल सिंग (Nigthoujam Popial Singh) हेही निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. पोपीलाल सिंग हे असे उमेदवार आहेत ज्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती शून्य असल्याचे जाहीर केले आहे. होय, तुम्ही बरोबर वाचले, जिथे मणिपूरच्या पहिल्या टप्प्यात 173 उमेदवारांपैकी 91 उमेदवार कोट्यधीश होते. त्याचबरोबर पोपीलाल सिंग यांच्याकडे कोणतीही मालमत्ता नाही. एवढेच नाही तर राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीतील ते सर्वात तरुण उमेदवार आहेत. काँग्रेस पक्षाकडे मागितले होते तिकीट पोपीलाल सिंग हे यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात होते, मात्र तेथे त्यांची निराशा झाली. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिले. सेकमाई प्रदेश स्थानिक अल्कोहोलयुक्त पेयांसाठी (Local Alcoholic Beverage) प्रसिद्ध आहे. राजकीय पंडितांच्या मते या जागेवर चुरशीची लढत अपेक्षित आहे. सेकमाई विधानसभेच्या जागेवर पोपीलाल सिंग यांच्याशिवाय इतर सात उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत.

BMC अधिकारी बंगल्यावर आल्यानंतर काय करणार नारायण राणे?

मतदार पैशाच्या मागे धावत नाहीत पोपीलाल सिंग यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर ते पदवीधर आहेत. ते म्हणतात, ‘मी बेरोजगार पदवीधर आहे. माझ्या गावातील विद्यार्थ्यांना शिकवून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. माझ्या मतदारसंघातील मतदार पैशाच्या मागे धावत नाहीत. तुम्ही त्यांना पैशाने जिंकू शकत नाही.’’ ते सांगतात की त्यांच्या भागातील लोक त्याला निवडणूक प्रचारात मदत करत आहेत. पोपीलाल सिंग घरोघरी जाऊन लोकांची मते मागत आहेत. तरुणांसाठी प्रेरणा या भागातील एक व्यक्ती म्हणतो, “पोपीलाल सिंग हा तरुण असून तो आपल्या समाजासाठी काम करत आहे. तो जे काही करतो ते मला प्रेरणा देते. त्यामुळे मी त्यांना पाठिंबा देत आहे. तो जिंकू किंवा हारो, ही वेगळी बाब आहे, पण तरुणांना राजकारणात यायला प्रवृत्त करण्याचे काम ते नक्कीच करत आहेत. भाजपचे आव्हान या निवडणुकीत सत्ताधारी भाजपसमोर पुन्हा विजय मिळवण्याचे मोठे आव्हान आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग हे सर्वतोपरी प्रयत्न करत असून, त्यांनी पुन्हा एकदा राज्यातील सत्तेची सूत्रे हाती घेतली आहेत. या निवडणुकीत काँग्रेससह जवळपास सर्वच राजकीय पक्ष सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा हटवण्याची मागणी करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात