नरेश पारीक, प्रतिनिधी चूरू, 22 जुलै : सापांना अनेकजण घाबरतात. मात्र, राजस्थान राज्यातील एक व्यक्ती अगदी पटकन कोब्रा सापाला पकडतो. आतापर्यंत या व्यक्तीने तब्बल 22 हजारहून अधिक विषारी सापांना पकडून त्यांना सुरक्षित जंगलात सोडले आहे. अरविंद सैनी असे या व्यक्तीचे नाव असून त्यांना सर्पमित्र म्हणून त्यांची ओळख आहे. अरविंद सैनी हे शहरातील वार्ड क्रमांक 59 मधील रहिवासी आहेत. तसेच ते शिक्षण विभागात वरीष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. मात्र, तरीही ते त्यांच्या प्राणीप्रेमामुळे उरलेल्या वेळेत कुणाच्याही एका फोन कॉलवर उपस्थित होतात. अरविंद सैनी सांगता की, फक्त 15 वर्षाचे असताना ते कोब्रासोबत खेळत होते. मात्र, जेव्हा त्यांच्या घरच्यांना ही बाब माहिती झाली तेव्हा त्यांना घरचे लोक त्यांच्यावर चांगलेच रागावले. मात्र, तरीसुद्धा ते घरच्यांपासून लपून गोगाचीच्या मेडीमध्ये जायचे आणि तिथे सापांसोबत खेळायचे. आताही त्यांना जर सापासंदर्भात कोणतीही सूचना आली तर ते सापाला पकडायला चालले जातात.
आता त्यांनी आपल्या 9 लोकांच्या पथकाला तयार केले आहे, जे आज त्यांच्यासोबत बचावपथक म्हणून काम करते. सर्वसामान्य लोकांमध्ये जागरुकता यावी, यासाठी त्यांनी युट्यूबवर https://www.youtube.com/@arvindsainisnakerescueteam हे चॅनेल सुरू केले आहे.
ते सांगतात की, बहुतांश साप हे विषारी नसतात. मात्र, अंधविश्वासामुळे तसेच जागरुकता कमी असल्याने लोक त्यांना मारतात. मात्र, साप कुणाला पाहिल्यावर आधी लपण्याचा प्रयत्न करतो. तसेच त्याच्यावर कुणी हल्ला करत आहे, असे त्याच्या लक्षात येताच तोसुद्धा चावा घेतो. कोब्रा असतो विषारी - अरविंद यांनी सांगितले की, चुरू जिल्ह्यात काळा नाग आणि कोब्रा सर्वात जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. साप पकडण्यासाठी ते कोणतेही शुल्क घेत नाहीत. मात्र, जर कुणी स्वेच्छाने त्यांना पैसे दिले तर ते त्या पैशांना निराधार गोवंश साठी असलेल्या हनुमानगढी गौशाला या संस्थेला देऊन देतात.