मराठी बातम्या /बातम्या /देश /

आईनं लॅपटॉप कचऱ्यात फेकल्याने 3000 कोटींचं नुकसान, तरुण गेला डिप्रेशनमध्ये; वाचा सविस्तर

आईनं लॅपटॉप कचऱ्यात फेकल्याने 3000 कोटींचं नुकसान, तरुण गेला डिप्रेशनमध्ये; वाचा सविस्तर

जुना लॅपटॉप त्याच्याकडे असता, तर आज तो कोट्यधीश झाला असता. मात्र हे होण्यापूर्वीच त्याचा लॅपटॉप आईनं कचऱ्यात फेकून दिला होता.

जुना लॅपटॉप त्याच्याकडे असता, तर आज तो कोट्यधीश झाला असता. मात्र हे होण्यापूर्वीच त्याचा लॅपटॉप आईनं कचऱ्यात फेकून दिला होता.

जुना लॅपटॉप त्याच्याकडे असता, तर आज तो कोट्यधीश झाला असता. मात्र हे होण्यापूर्वीच त्याचा लॅपटॉप आईनं कचऱ्यात फेकून दिला होता.

  • Published by:  desk news

वी दिल्ली, 19 डिसेंबर: नवा लॅपटॉप (Laptop) घेतल्यामुळे आईनं (Mother) जुना लॅपटॉप टाकून (Throw away) दिला. मात्र त्यामुळे एका तरुणाचं हजारो कोटींचं नुकसान (Thousands of crores loss) झाल्याची घटना समोर आली आहे. एका तरुणानं रेडिट.कॉमवर ओळख न सांगता आपलं दुःख व्यक्त केलं आहे. आपल्या आईनं अजाणतेपणे हे कृत्य केल्यामुळे आपण काहीच बोलू शकत नसलो, तरी या घटनेमुळे आपण डिप्रेशनमध्ये गेलो होतो, असा अनुभव त्याने व्यक्त केला आहे.

घेतले होते 10 हजार बिटकॉईन्स

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार जेव्हा तरुण कॉलेजमध्ये होता, तेव्हा त्याने 10 हजार बिटकॉईन्स खरेदी केले होते. आपल्या मित्राच्या सांगण्यावरून केवळ 6 हजार रुपये त्यात गुंतवले होते आणि ही बाब आपण विसरूनही गेलो होतो. त्यानंतर काही दिवसांनी त्याच मित्राने याबाबत विचारणा केली, तेव्हा त्याला बिटकॉईन घेतले असल्याची आठवण झाली. त्याने त्याबाबतचे तपशील त्याच्या जुन्या लॅपटॉपमध्ये सेव्ह केले होते. तो तातडीनं घरी गेला आणि जुना लॅपटॉप शोधू लागला. बराच वेळ शोध घेतल्यानंतरही त्याला लॅपटॉप काही सापडला नाही.

आईनं फेकला लॅपटॉप

लॅपटॉप सापडत नसल्याने त्याने याबाबत त्याच्या आईला विचारलं. त्यावर नवा लॅपटॉप घेतल्यामुळे जुना लॅपटॉप आपण कचऱ्यात फेकून दिला, असं आईनं सांगितलं. ते ऐकल्यावर तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्याला जबर मानसिक धक्का बसला.

कोट्यवधी गमावले

बिटकॉईनची सुरुवात 2009 साली झाली, तेव्हा नगण्य किंमतीत बिटकॉईन मिळत होते. त्यानंतर त्याची मागणी प्रचंड वाढली आणि त्याची किंमत अनेक पटींनी वाढली. तरुणाने त्यावेळी गुंतवलेल्या 6 हजार रुपयांची किंमत आता 3000 कोटी रुपये झाली आहे. इतका गडगंज फायदा होऊनही खरेदी केलेल्या बिटकॉईनचे तपशील असणारा लॅपटॉपच गायब झाल्याने तरुणाकडे काहीच पर्याय नाही.

हे वाचा- चक्रीवादळाचा फटका; 100 जणांचा मृत्यू; तीन लाखांहून अधिक लोकं स्थलांतरित

मानसिक आंदोलनं

एवढं आर्थिक नुकसान झाल्याचं लक्षात आल्यावर तरूण डिप्रेशनमध्ये गेला होता. आता तो त्यातून सावरला असला तरी एका कारणामुळे आपला होऊ शकणारा कोट्यवधींचा फायदा हातून गेल्याचा पश्चात्ताप त्याला अस्वस्थ करत राहतो, अशा भावना त्यानं शेअर केल्या आहेत.

First published:

Tags: Depression, Money, Mother, Son