नवी दिल्ली, 2 एप्रिल : ड्रग्जच्या आहारी गेलेले लोक (drugs addict people) नशेत किंवा नशेसाठी (Intoxication) काय करतील, याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. अशाच एका व्यक्तीनं त्याच्या गुप्तांगात कोकेन (cocaine) टोचलं. तेही एकदा नाही तर तीनदा. पण तिसर्यांदा त्याची अवस्था अशी झाली, की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. गुप्तांगाच्या सभोवतालची जागा कुजली होती आणि दुर्गंधी येत होती परिस्थिती बिघडली आणि वेदना असह्य झाल्या तेव्हा या तरुणानं डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण प्रकार जाणून घेतल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाचं गुप्तांग आणि आजूबाजूचा परिसर (private area) पाहिला. तेव्हा त्यांना धक्काच बसला. असा प्रकार त्यांनी आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार परिस्थिती गंभीर होती. गुप्तांग आणि आजूबाजूच्या भागातील ऊती सडल्या होत्या. मांसपेशी खराब झाल्या होत्या. त्यांना दुर्गंधही येत होता. मूत्र आणि शुक्राणू सोडणारी ट्यूब आणि आजूबाजूच्या भागात फोड आल्यासारखे दिसत होते. डॉक्टरांना सुरुवातीला वाटलं की, हे गॅंग्रीनचं लक्षण आहे. असं असतं तर शक्य तितक्या लवकर त्याचं गुप्तांग कापून टाकावं लागलं असतं. पण आधी तपासणी करायचा निर्णय घेतला आणि तो योग्य होता. तपासणीत हे गँगरीनचं लक्षण नसल्याचं समोर आलं. प्राणघातक संसर्गाशी संबंधित आणखी एक चाचणी केली. परंतु, त्याचा अहवालही निगेटिव्ह आला. यानंतर आणखी काही डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला. डॉक्टर म्हणाले, कुजलेला भाग कापावा लागेल एका मतानं ठरवलं गेलं की प्रथम काही प्रतिजैविकं (अँटीबायोटिक्स) द्यावी, ज्यामुळं स्थिती सुधारू शकते आणि सडणं कमी किंवा कमी वेगानं होऊ शकतं. औषधांनी या व्यक्तीमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून आले. बाधित जागा बरी होत होती. परंतु, डॉक्टर अजूनही समाधानी नव्हते. लवकरच परिस्थिती आणखी बिघडू शकते, हे त्याला माहीत होते. ते पाहून त्या व्यक्तीला ते म्हणाले की, आता बरं वाटत असलं तरी ते पण फार काळ टिकणार नाही. गुप्तांग कापावं लागेल. विशेषत: जो भाग आता सडला आहे तो कापावा लागेल. यामुळं सडणं आणखी शरीरात पसरण्यापासून रोखलं जाईल. पण हे ऐकून तो तरुण घाबरला आणि तिथून निघून जाऊ लागला. नंतर त्याला थांबवण्यात आलं आणि उपचाराची दुसरी पद्धत समजावून सांगितली गेली. तथापि, हे उपचार जास्त काळ चालणारे होते. सुमारे दोन आठवड्यांच्या उपचारानंतर सकारात्मक परिणाम आले. संसर्ग बर्याच प्रमाणात थांबला होता आणि जखमही बरी होत होती. सुई वारंवार टोचल्यानं अंगावर खुणा उमटल्या, मग एक दिवस केला असा प्रकार या दोन आठवड्यांदरम्यान त्या व्यक्तीनं सांगितलं की, तो अनेक महिन्यांपासून ड्रग इंजेक्शन घेत आहे. तो केवळ इंजेक्शनद्वारेच ड्रग्ज घेत असे. इंजेक्शनमुळे त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी खुणा उमटल्या होत्या. आता नवीन जागा दिसत नसल्यानं त्यानं गुप्तांगात इंजेक्शन देण्याचा निर्णय घेतला. हे काम त्यांनी सलग दोन आठवडे केलं. तो आठवड्यातून एकदा गुप्तांगाच्या मागील शिरांमध्ये इंजेक्शन देत असे. तेव्हा त्याला काहीही झालं नाही. पण जेव्हा त्यानं तिसऱ्या आठवड्यात तसं केलं तेव्हा परिस्थिती आणखी बिघडली. संसर्गामुळं नेक्रोसिस आणि गॅंग्रीनचा धोका होता आणि तो भाग कापून टाकावा लागला असता. यासंबंधीच्या अहवालात अशा नाजूक अवयवांवर ड्रग्ज इंजेक्शन्स घेऊ नयेत, अशी सूचना इंजेक्शनच्या माध्यमातून नशा करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात यावी, अशी विनंती सरकारला करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.