चेन्नई, 11 जून : तामिळनाडूमध्ये सध्या एक ‘राजकीय’ लग्न चर्चेचा विषय बनलं आहे. सेलम जिल्ह्यामध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचं लग्न समाजवाद (Socialism) बरोबर होणार आहे. नाव वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे अगदी खरं आहे. नवरा मुलगा समाजवाद आणि नवरी मुलगी ममता बॅनर्जी यांचे 13 जून रोजी लग्न होणार आहे. केवळ हे जोडपे नाही तर या कुटुंबातील अनेकांची नावं अतिशय वेगळी आहेत. समाजवाद म्हणजे सोशालिझम याच्या वडिलांचे नाव आहे मोहन. त्यांना तीन मुलं आहेत. त्यांची नाव कम्युनिझम (Communism) लेनिनीझम (Leninism) आणि सोशालिझम (Socialism) ही आहेत. मोहन हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI) चे जिल्हा सचिव आहे. कम्युनिस्ट विचारांचे ते समर्थक असून पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. मोहन यांनी News 18 हिंदीशी फोनवरुन बोलताना बरीच विलक्षण माहिती सांगितली. त्यांचे कुटुंब गेल्या चार पिढ्यापासून कम्युनिस्ट आहे. सेलममध्ये गेल्या 80 वर्षांपासून कम्युनिस्ट विचार रुजला आहे. आमचे पूर्वज देखील कम्युनिस्ट होते. मी चौथ्या पिढीचा कम्युनिस्ट आहे. सेलममध्ये अनेकांची नाव व्हिएतनाम, मॉस्को, रशिया, चेकोस्लोवाकिया आहेत."
मुलांच्या नावाचे कारण काय? मुलांच्या या नावाचं कारण संगताना मोहन म्हणाले की, “90 च्या दशकात सोव्हिएत संघाची फाळणी झाली. त्यावेळी माझी पत्नी गर्भवती होती. मुलांची नाव मजबूत कम्युनिस्ट विचारसरणीची असतील असं मी तेव्हा ठरवले. त्यामुळे मी मोठ्या मुलाचे नाव कम्युनिझम ठेवले. त्यानंतर दुसऱ्या मुलाचे नाव लेनिनीझम तर तिसऱ्याचे नाव सोशालिझम असे ठेवले. आम्हाला मुलगी झाली असती तर तिचे नाव मार्क्सिया ठेवले असते. गप्पांच्या नादात नर्सने एकाच व्यक्तीला दिले कोरोना लशीचे एकापाठोपाठ 2 डोस आमची मुलं अनेक आंदोलनात सहभागी झाली आहेत. त्याचबरोबर ते सीपीआय (एम) पक्षाचे सदस्य आहेत. मुलं फक्त 5 वर्षांची होती तेव्हापासून मी त्यांना पक्षाच्या बैठकीत जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. दिल्लीमध्ये 2009 साली झालेल्या आंदोलनात कम्युनिझम आणि लेनिनीझम सहभागी झाले होते. माझ्या कोणत्याही मुलाला अद्याप मुलगी झालेली नाही झाली तर त्याचे नाव क्यूबाइझम ठेवणार आहे.” अशी माहिती मोहन यांनी दिली.