'महात्मा गांधींचा स्वातंत्र्य संग्राम' हे एक नाटक होतं, भाजप खासदाराचं धक्कादायक वक्तव्य

'महात्मा गांधींचा स्वातंत्र्य संग्राम' हे एक नाटक होतं, भाजप खासदाराचं धक्कादायक वक्तव्य

भाजप खासदाराने गांधींच्या 'महात्मा' या पदवीवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे

  • Share this:

बंगळुरू, 3 फेब्रुवारी : भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी यावेळी महात्मा गांधींबाबत (Mahatma Gandhi) विवादास्पद वक्तव्य केलं आहे. हेगडे यांनी गांधींच्या नेतृत्वात भारतात झालेलं स्वातंत्र्याचं आंदोलन एक नाटक असल्याचा उल्लेख केला आहे. इतकंच नाही तर भाजप खासदाराने गांधींच्या 'महात्मा' या पदवीवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी शनिवारी कर्नाटकातील बंगळुरुमधील एक जनसभेदरम्यान असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. कर्नाटक उत्तर कन्ननमधून लोकसभा खासदार हेगडे यांनी यादरम्यान भारताच्या स्वातंत्र्य़ संग्रामाचा उल्लेख केला. ते म्हणाले, की पूर्ण स्वातंत्र्य संग्राम ब्रिटीश सरकारच्या परवानगी आणि समर्थनातून रचण्यात आला. स्वातंत्र्यांच्या आंदोलनादरम्यान तथाकथित नेत्यांनी एकदा देखील पोलिसांचा मार खाल्ला नाही. एकदाही नाही. गांधींचा स्वातंत्र्य संग्राम हे एक नाटक होतं, असंही ते यावेळी म्हणाले.

गांधीचा सत्याग्रह व उपोषण हे नाटक होतं

अनंत कुमार हेगडे यांनी महात्मा गांधीचे उपोषण आणि सत्याग्रह देखील एक नाटक असल्याचे वक्तव्य केलं. ते म्हणाले की, कॉंग्रेसचे समर्थक म्हणतात की आमरण उपोषण आणि सत्याग्रहामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. हे बरोबर नाही. हेगडे पुढे जाऊ असंही म्हणाले की इंग्रजांनी सत्याग्रहामुळे देश सोडला नाही तर इंग्रज निराश झाल्याने भारतातून निघून गेले होते.

इतिहास वाचल्यावर राग येतो

हेगडे म्हणाले, जेव्हा मी इतिहास वाचतो तेव्हा मला अत्यंत राग येतो. देशाबाबत असं नाटक करणाऱ्या गांधींसारख्या व्यक्ती आपल्या देशात महात्मा म्हणवून घेतात.

First published: February 3, 2020, 9:57 AM IST

ताज्या बातम्या