नवी दिल्ली, 15 डिसेंबर : पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्याविषयी मोदी सरकारमधील एका मंत्र्याने धक्कादायक विधान केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नेहरू ड्रग्ज घेत होते तर गांधी दारू पीत होते असे बेताल वक्तव्य केले आहे. राजस्थानमधील भरतपूर येथे आयोजित नशा मुक्ती जागरण अभियान कार्यक्रमा वेळी त्यांनी असे वक्तव्य केले आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर म्हणाले की, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ड्रग्ज सेवन करायचे. एवढेच नाही तर महात्मा गांधींच्या एका मुलाबाबतही त्यांनी असाच दावा केला. एएनआय या वृत्तसंस्थेने त्याचा व्हिडिओ जारी केला आहे.
हे ही वाचा : भानामतीच्या नादात स्वतःच्या मुलीची हत्याकरून मृतदेह पुरला किचनमध्ये, औरंगाबादमधील धक्कादायक घटना
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर म्हणतात, ‘जवाहरलाल नेहरू ड्रग्ज घेत असत, सिगारेट ओढत असत आणि महात्मा गांधींचा एक मुलगा ड्रग्स घेत असे. याबात वाचून बघा तुम्हाला खरी माहिती मिळेल. ते पुढे म्हणाले की, अमली पदार्थांमुळे जगासह आपल्या देशाला पूर्णपणे काबीज केले आहे.
#WATCH जवाहर लाल नेहरू जी नशा करते थे, सिगरेट पीते थे और महात्मा गांधी जी का एक लड़का नशा करता था। आगर आप पढ़ेंगे और देखेंगे तो पता चल जाएगा: नशा मुक्ति जागरण अभियान कार्यक्रम में केंद्रीय आवासन एवं शहरी कार्य राज्यमंत्री मंत्री कौशल किशोर, भरतपुर, राजस्थान (14.12) pic.twitter.com/VdZZ93k8sx
— ANI_HindiNews (@AHindinews) December 14, 2022
अमली पदार्थांमुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या हानीबाबत लोकांमध्ये जितकी भीती निर्माण होईल तितकीच भीती निर्माण करावी, असे आमचे आवाहन आहे. ज्याप्रमाणे विषाची दुकाने नाहीत, त्याचप्रमाणे दारुची दुकानेही बंद करण्यात यावेत असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी अंमली पदार्थांच्या विरोधात आवाज उठवत आहेत. त्यांचे ट्विटर हँडल पाहिल्यावर असे दिसून येते की ते नेहमी ड्रग्जच्या विरोधात लोकांना जागरूक करत असतात. यापूर्वी मंत्री कौशल किशोर यांनी ट्विट करून लोकांना ड्रग्ज सोडण्याचे आवाहन केले होते.
कौशल किशोर यांनी ट्विट केले होते की, मी स्वत: खासदार झालो, माझी पत्नी आमदार झाल्यानंतरही मी माझ्या मुलाचे आयुष्य अंमली पदार्थांच्या व्यसनापासून वाचवू शकलो नाही, पण मला आता हेच हवे आहे की, ड्रग्जमुळे कोणत्याही आई-वडिलांनी आपले मूल गमावू नये. अशी माझी इच्छा असल्याचे ते म्हणाले.
हे ही वाचा : मैत्री आली अंगाशी 17 वर्षीय शाळकरी मुलीवर अॅसिड, थरारक Video समोर
त्यांनी दुसर्या ट्विटमध्ये म्हटले होते की, कोणत्याही बहिणीने ड्रग्जमुळे तिचा भाऊ गमावू नये आणि ड्रग्जमुळे कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा मृत्यू होऊ नये, म्हणून मला नशा मुक्त समाज आंदोलन अभियान कौशल का या माध्यमातून खूप काम करायचे आहे. अंमली पदार्थमुक्त भारत देशाची जाणीव करून द्या. या चळवळीत जे माझ्या सोबत आहेत त्यांनी कमेंट करा आणि तुमचा मोबाईल नंबर लिहा.