Home /News /national /

वर्षभरापूर्वी लग्न; चार दिवसांपूर्वी अपघातात गमावला पती, धक्का न सहन झालेल्या पत्नीनं उचललं मोठं पाऊल

वर्षभरापूर्वी लग्न; चार दिवसांपूर्वी अपघातात गमावला पती, धक्का न सहन झालेल्या पत्नीनं उचललं मोठं पाऊल

(Photo Credit- Aaj Tak)

(Photo Credit- Aaj Tak)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) निवारीमध्ये पतीच्या मृत्यूने पत्नीला इतका धक्का बसला की आत्महत्या करण्यासाठी तिने ओरछा येथील जहांगीर महल गाठली.

    मध्य प्रदेश, 21 मे: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) निवारीमध्ये पतीच्या मृत्यूने पत्नीला इतका धक्का बसला की आत्महत्या करण्यासाठी तिने ओरछा येथील जहांगीर महल गाठली. मात्र पोलीस, पुरातत्व विभाग, प्रशासन आणि कुटुंबीयांनी या महिलेला वाचवले. नीलम अहिरवार असे या महिलेचं नाव आहे. या आठवड्यात नीलमच्या पतीचा मौरानीपूर हायवेवर (Mauranipur highway) अपघात झाला होता, त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पतीच्या निधनामुळे नीलम इतकी दु:खी झाली की तिने आधी ओरछा येथील बेटवा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मात्र तेथे अनेक लोक असतात, त्यामुळे महिलेनं आत्महत्या करण्यासाठी जहांगीर महलची निवड केली. नीलमने आत्महत्या करण्यासाठी महलावर चढताच तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी तिला पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली. दोन ट्रक-कारचा अपघात, जबरदस्त धडकेनंतर भीषण आग; Live Video  तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर नीलमला सुखरूप खाली आणण्यात आलं. एकीकडे साधनसामग्रीची कमतरता तर दुसरीकडे जीव देण्याच्या जिद्दीने महिलेची सुटका करणे अवघड होते. बचाव पथकाच्या जवानांचे बाल्कनीपर्यंत जायचे प्रयत्न सुरू झाले. परिस्थिती खूप गंभीर होती कारण कोणीतरी येताना पाहून महिला काहीतरी चुकीचे करू शकते अशी भीती होती. दरम्यान नीलमच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर तिचे वडील आणि मृत पतीचे मित्र तेथे पोहोचले. त्यांच्या समजावण्याचा ही काही परिणाम झाला नाही. दुसरीकडे ओरछा पोलीस स्टेशनचे प्रभारी अभय प्रताप सिंह यांनी त्यांच्या टीमसह संसाधने जमवण्यास सुरुवात केली. तहसीलदार संदीप शर्मा हेही डॉक्टरांच्या पथकासह तेथे पोहोचले. दागिने फेकण्यास सुरुवात केली सर्व अधिकार्‍यांना महिलेला काही गोष्टीत अडकवून ठेवायचं होतं, पण महिला अशी होती की ती ते मानायला तयार नव्हती. महिलेनं आपले सर्व दागिने खाली टाकण्यास सुरुवात केली. नीलम ज्या राजवाड्यात बसली होती त्या राजवाड्याच्या बाल्कनीत जाण्यासाठी विशेष रस्ता नव्हता. उडी मारत नीलम त्या बाल्कनीत पोहोचली होती. यामुळे तिच्या हाताला, पायांना आणि कमरेला गंभीर दुखापत झाली. धाकटी बहिण समजावताच ऐकली नीलम सर्वजण नीलमला समजावून सांगत होते की तिने असं पाऊल उचलू नये. तेवढ्यात नीलमची धाकटी बहीण तिथे पोहोचली. तिला बराच वेळ समजावल्यानंतर नीलम तयार झाली. त्यानंतर पोलीस तिला सुखरूप खाली आणतात. या संपूर्ण बचावासाठी सुमारे 3 तास लागले. तोपर्यंत त्या महिलेने काही चुकीचे करू नये, यामुळे तिथे उपस्थित सर्वांचा श्वास रोखून धरला होता. गेल्या वर्षी नीलमचा अमितसोबत झाला होता प्रेमविवाह निवारीच्या नीलमचा गेल्या वर्षी मौरानीपूरच्या अमित अहिरवारसोबत प्रेमविवाह झाला होता. अमित मौरानीपूरचा खूप चांगला फोटोग्राफर होता. त्यांच्या लग्नाला एक वर्ष झाले होते आणि 4 दिवसांपूर्वी अमित रस्त्यावर अपघातात गंभीर जखमी झाला आणि शुक्रवारी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर ही महिला झाशीहून ओरछा येथे आली आणि आत्महत्या करण्याच्या इराद्याने येथील जहांगीर महालावर चढली होती.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Madhya pradesh, Suicide attempt

    पुढील बातम्या