Home /News /national /

दोन ट्रक-कारचा अपघात, जबरदस्त धडकेनंतर भीषण आग; Live Video, 6 जणांचा मृत्यू

दोन ट्रक-कारचा अपघात, जबरदस्त धडकेनंतर भीषण आग; Live Video, 6 जणांचा मृत्यू

अरवली जिल्ह्यात (Aravali District) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन ट्रक आणि कारची एकमेकांना धडक बसली.

    गुजरात, 21 मे: गुजरातच्या (Gujarat) अरवली जिल्ह्यात (Aravali District) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन ट्रक आणि कारची एकमेकांना धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की धडक बसल्यानंतर आग (Fire Broke Out) लागली. मोडासा येथील आलमपूरजवळ दोन ट्रक आणि कारच्या धडकेनं भीषण आग लागली. केमिकलनं भरलेल्या टँकरच्या धडकेनं भीषण आग लागली. या अपघाताचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. या अपघातात 6 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यात एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या अपघातानंतर आग लागल्यानं मोडासा-नडियाद महामार्ग बंद करण्यात आला होता. लग्नाला जाण्याआधीच कुटुंबावर काळाचा घाला, 6 जण ठार उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बलरामपूर (Balrampur District) जिल्ह्यात महिंद्रा बोलेरो आणि ट्रॅक्टर-ट्रॉली यांच्यात भीषण टक्कर झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत एकाच कुटुंबातील आहेत. त्याचवेळी या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. बोलेरो आणि ट्रॅक्टर-ट्रॉलीची धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात बलरामपूरच्या तुलसीपूर पोलीस स्टेशन (Tulsipur Police Station) हद्दीतील गणवारिया (Ganwaria Village) गावाजवळ घडला आहे. बोलेरोमधील सर्व नऊ जण लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात होते. दरम्यान, बलरामपूरच्या तुलसीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गणवारिया गावाजवळ ट्रॅक्टरची ट्रॉलीला धडक बसली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Gujrat

    पुढील बातम्या