जाहिरात
मराठी बातम्या / देश / 3,419 कोटी रुपये Electricity Bill पाहून बसला 'शॉक', हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची आली वेळ

3,419 कोटी रुपये Electricity Bill पाहून बसला 'शॉक', हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची आली वेळ

3,419 कोटी रुपये Electricity Bill पाहून बसला 'शॉक', हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची आली वेळ

एका कुटुंबाला तब्बल 3,419 कोटी रुपयांचं वीज बिल (Electricity Bill) आलं आहे. यामुळे त्या घरातील ज्येष्ठाची तब्येतच बिघडली.

    मुंबई, 29 जुलै :  मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वाल्हेरमध्ये एका कुटुंबाला तब्बल 3,419 कोटी रुपयांचं वीज बिल (Electricity Bill) आलं आहे. यामुळे त्या घरातील ज्येष्ठाची तब्येतच बिघडली, तर त्यांची सूनेला मानसिक धक्का बसला आहे.

    ग्वाल्हेरमधील शिव विहार कॉलनीतील रहिवासी असलेल्या कांकणे कुटुंबाला मध्य प्रदेश वीज विभागाकडून तब्बल 3,419 कोटी रुपयांचे वीज बिल आलं. या नंतर मध्य प्रदेश सरकारच्या अखत्यारित असलेल्या वीज कंपनीने चुकून एवढी रक्कम छापली गेल्याचं मान्य केलं आणि कुटुंबाला सुधारित बिल पाठवलं. हे बिल 1,300 रुपये होतं. सुधारित बिल पाहून चिंतित कांकणे कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.

    काय आहे प्रकरण?

    प्रियंका यांचे पती संजीव कांकणे यांनी सांगितलं की, जुलै महिन्याच्या घरगुती वापराच्या वीज बिलाचा कोट्यवधींचा आकडा पाहून त्यांचे वडील आजारी पडले. या बिलाचे 20 जुलै रोजी मध्य प्रदेश मध्य क्षेत्र विद्युत वितरण कंपनीच्या (MPMKVVC) पोर्टलद्वारे क्रॉस-व्हेरिफिकेशन करण्यात आलं. त्यामध्ये या बिलात चूक झाल्याचं लक्षात आलं. नंतर राज्य वीज कंपनीने बिल दुरुस्त केलं.

    वंशाच्या दिव्यासाठी मुलींसमोर आईला पेटवलं, पोरींच्या लढ्यामुळे बापाला घडली जन्माची अद्दल

     MPMKVVC चे जनरल मॅनेजर नितीन मांगलिक यांनी वीज बिलातील एवढ्या मोठ्या रकमेला मानवी चूक झाल्याचं सांगत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितलं.

    ‘एका कर्मचार्‍याने सॉफ्टवेअरमध्ये वापरल्या जाणार्‍या युनिटच्या जागी ग्राहक क्रमांक टाकला, त्यामुळे बिलावर जास्त रक्कम छापून आली. संबंधित वीज ग्राहकाला 1,300 रुपयांचं सुधारित बिल देण्यात आलं आहे,’ असंही त्यांनी सांगितलं.

    ही चूक दुरुस्त करण्यात आली असून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य प्रदेशचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांनी पत्रकारांना दिली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात