बनारस, 15 मे : कोरोनाच्या महासंकटामुळे अनेक मजूर आपल्या मूळ गावी परतत आहे. मिळेल त्या गाडीनं आणि काहीच नाही तर पायी चालत जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून मजुरांची होणारी ही ओढाताण त्यांची लॉकडाऊनमुळे होत असलेली फरफट आपल्याला व्हिडीओ आणि फोटोच्या माध्यमातून पोहोचत आहे. मजूर घरी जाण्यासाठी धडपड करत आहेत. कुणी सायकलवरून तर कुणी स्वत: बैलासोबत गाडीला जुंपून गावी जात आहे. सध्या सोशल मीडियावर आणखी एक वेदनादायी व्हिडीओ व्हायरल होत आहे. 11 वर्षाच्या मुलाचा आहे, जो आपल्या आईवडिलांना सायकल रिक्षामध्ये बसवून आपल्या मूळ गावी घेऊन जात आहे. तवारे आलम असं या मुलाचं नाव आहे. हा 11 वर्षांचा मुलगा आपल्या आई-वडिलांना सायकल रिक्षामध्ये बसवून स्वत: ती चालवत आहे. बनारस ते बिहार असा तो प्रवास करत असताना हा व्हिडीओ काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे वाचा- आषाढी वारी सोहळा होणार की नाही? अजित पवार यांच्या समोर आज फैसला वडील रिक्षा चालवून थकतात तेव्हा तो ही रिक्षा चालवतो असं या मुलानं सांगितलं आहे. हा व्हिडीओ पाहून आपल्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहात नाहीत. जसं श्रावण बाळानं कावडीमधून आई-वडिलांना नेलं होतं तसंच या मुलानं आपल्या आई-वडिलांना रिक्षातून नेलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युझर्सचं अंतःकरण भावूक झालं आहे. मुलाच्या या जिद्दीला आणि उत्साहाला सलाम केला आहे. मुलाची फरफट, पायी प्रवास करणाऱ्या आईनं केली सुटकेसची बाबागाडी उत्तर प्रदेशातील आग्रा इथला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चिमुकला बॅगवर झोपला आहे आणि ती बॅग ओढत रस्त्यावरून चालत आहेत. हा चिमुकला चालून थकल्यामुळे तो सूटकेसवर झोपला. तशाच अवस्थेत ही महिला ती बॅग ओढत पायी प्रवास करत आहे. हे वाचा- लॉकडाऊनमध्ये कुटुंबासोबत घरात होती मेरी कोम, अचानक आले पोलीस आणि… संपादन- क्रांती कानेटकर