जाहिरात
मराठी बातम्या / देश / VIDEO: शाळेतील टॉयलेटची अवस्था पाहून भडकले ऊर्जामंत्री; स्वतःच हातात झाडून घेऊन केली स्वच्छता

VIDEO: शाळेतील टॉयलेटची अवस्था पाहून भडकले ऊर्जामंत्री; स्वतःच हातात झाडून घेऊन केली स्वच्छता

VIDEO: शाळेतील टॉयलेटची अवस्था पाहून भडकले ऊर्जामंत्री; स्वतःच हातात झाडून घेऊन केली स्वच्छता

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ते कधी रस्ता साफ करताना, कधी सार्वजनिक टॉयलेट साफ करताना, तर कधी विजेच्या खांबावर चढून झाडं झुडपे साफ करताना दिसले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मध्य प्रदेश, 18 डिसेंबर: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर (Pradyuman Singh Tomar)हे आपल्या खास स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते कधी रस्ता साफ करताना, कधी सार्वजनिक टॉयलेट साफ करताना, तर कधी विजेच्या खांबावर चढून झाडं झुडपे साफ करताना दिसले आहेत. अशा परिस्थितीत शुक्रवारी पुन्हा एकदा ते अशाच शैलीत दिसले. यादरम्यान त्यांनी ग्वाल्हेरच्या गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूल हजीरा गाठलं. येथील अस्वच्छता पाहून प्रथम शाळा व्यवस्थापनाला फटकारलं, त्यानंतर ग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि डीईओ यांना बोलावून त्यांना चांगलंच खडसावलं. यानंतर ऊर्जामंत्री तोमर यांनी स्वत: साफसफाईची जबाबदारी घेतली. त्यांनी स्वत: ब्रश आणि पाणी घेऊन शाळेचं टॉयलेट स्वच्छ केलं. यासोबतच मुलांशी संवाद साधून स्वच्छतेचा संदेश दिला आहे.

जाहिरात

हेही वाचा-  Womens IPL कधी सुरू होणार? सौरव गांगुलीने केला मोठा खुलासा राज्याचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर हे शुक्रवारी सरकारी कन्या माध्यमिक विद्यालयाची (Govt Girls School Hajira) पाहणी करण्यासाठी हजीरा परिसरात आले होते. जिथे त्यांनी शाळेतील विद्यार्थिनींशी संवाद साधला. अशा परिस्थितीत शाळेतील टॉयलेट अत्यंत अस्वच्छ असल्याचे विद्यार्थिनींनी मंत्र्यांना सांगितले. त्यामुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. इथे आत जाऊन पाहिलं तर टॉयलेट खूप घाण होतं. डास होते, हे पाहून ऊर्जामंत्री संतापले. शाळेत जाऊन स्वतः स्वच्छ केलं टॉयलेट त्याचवेळी हे ऐकून ऊर्जामंत्री थेट शाळेच्या टॉयलेटमध्ये गेले. यावेळी शाळेतील टॉयलेट खरोखरच अस्वच्छ असल्याचं त्यांनी पाहिले. अशा परिस्थितीत कोणताही वेळ न घालवता त्यांनी स्वत:च्या हातानं टॉयलेट स्वच्छ करण्यास सुरुवात केली. जिथे मंत्री महोदयांनी संपूर्ण टॉयलेट ब्रशने घासून स्वच्छ केलं.

मंत्र्यांचा टॉयलेट साफ करतानाचा व्हिडिओ (Pradyuman Singh Tomar Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासोबतच शाळांमधील टॉयलेट स्वच्छ करण्याच्या सूचनाही ऊर्जामंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचवेळी तोमर म्हणाले की, ग्वाल्हेर जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळांची टॉयलेट स्वच्छ झाली पाहिजेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात