भोपाळ, 14 जुलै : दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ते आणण्यात आले होते. यापैकी चार दिवसांपूर्वी एका चित्त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या पाच महिन्यात 8 चित्त्यांनी प्राण गमावले आहेत. यामध्ये 5 मोठ्या आणि 3 लहान चित्त्यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशात कुनो पार्कमधील चित्ता प्रोजेक्ट हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून शुक्रवारी चित्त्याच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा या प्रकल्पाला मोठा धक्का बसला आहे. नामीबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणण्यात आलेल्या चित्त्यांपैकी हा सूरज या आठव्या चित्त्याचा मृत्यू झाला आहे. 17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुनो नॅशनल पार्कमध्ये नामीबियातून आणलेल्या चित्त्यांना सोडलं होतं. SDM ज्योति मौर्या आणि मनीष दुबेचं अफेअर आलोकला कसे माहिती झालं? पोलीस तपासात थक्क करणारे खुलासे.. वनअधिकाऱ्यांनी सांगितले की, सूरज चित्ता पालनपूर पूर्वेकडील जंगल रेंजमच्या मसावनी बीटमध्ये पडलेला आढळला. आम्ही जवळ गेलो तेव्हा त्याच्या मानेवर किडे घोंगावत होते. तिथून तो उठून पळून गेला. त्यानंतर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले तर सकाळी नऊच्या सुमारास तो मृतावस्थेत आढळला. पहिल्यांदाच मोकळ्या जंगलात चित्त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या पाठीवर आणि गळ्यावर जखमेचे व्रण होते अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कुनो नॅशनल पार्कमध्ये 26 जून रोजी सूरजला मोठ्या पिंजऱ्यातून मोकळ्या जंगलात सोडण्यात आलं होतं. मोकळ्या जंगलात सोडण्यात आलेला सूरज हा दहावा चित्ता होता. तर दक्षिण आफ्रिकेतून आणलेला आणि 6 नंबरच्या पिजऱ्यात ठेवलेल्या तेजस या चित्त्याचा 11 जुलै रोजी मृत्यू झाला होता. कुनो नॅशनल पार्कमध्ये नामीबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून एकूण 20 चित्ते आणले गेलो होते. सध्या कुनो पार्कमध्ये 15 चित्ते वयस्क असून 1लहान पिल्लू आहे. यांची प्रकृती स्वस्थ असल्याची माहिती देण्यात आली आहे. यापैकी 12 चित्त्यांना जंगलात मोकळं सोडण्यात आलं असून अद्याप पाच चित्ते पिंजऱ्यात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.