प्रयागराज, 14 जुलै : सध्या सोशल मीडियावर महिला अधिकारी ज्योति मौर्या आणि पंचायत राज विभागात शिपाई पदावर कार्यरत पती आलोक मौर्या यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आहे. प्रत्येक दिवशी याप्रकरणी काही ना काही खुलासे होत आहे. या दोघांमध्ये जो वाद झाले त्याचे कारण म्हणजे होमगार्ड कमांडंट मनीष दुबेच असल्याचे समोर आले आहे. ज्योति मौर्या आणि आलोक कुमार मौर्या यांचे लग्न 2010 मध्ये झाले होते. लग्न झाले तेव्हा आलोक मौर्या हा पंचायत राज विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदावर कार्यरत होते. मात्र, 2015 मध्ये ज्योती मौर्या यांनी यूपी लोकसेवा आयोगाच्या पीसीएस परीक्षेत बाजी मारत 16 वी रँक मिळवली. यानंतर त्या एसडीएम पदावर कार्यरत झाल्या. यादरम्यान, त्यांचे पती आणि त्यांच्यामध्ये सर्व काही ठीक होते. मात्र, 2021 मध्ये मनीष दुबेची ज्योती मौर्या यांच्या आयुष्यात एंट्री झाली आणि सर्व काही बदलून गेले. दोन्ही पती पत्नीमध्ये दुरावा वाढू लागला.
न्यूज18 ला एका विश्वसनीय सूत्रांकडून एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली. ती अशी की, जोपर्यंत आलोक मौर्याला आपल्या हत्येच्या कटाबाबत माहिती नव्हते तोपर्यंत त्यांनी हे प्रकरण सार्वजनिक नाही केले होते. दरम्यान, ज्योती मौर्या यांनी पती आलोक मौर्यावर व्हॉट्सअॅप हॅक केल्याचा आणि कॉल रेकॉर्डिंगची चोरी केल्याचा आरोप खोटा आहे. तपासात ही माहिती समोर आली आहे की, ज्योती मौर्या या मोबाईलचा वापर करत होत्या, त्या नंबर वर वापरण्यात येणारे व्हॉट्सअॅप घरात पडलेल्या एका जुन्या मोबाईलमध्येही वापरले जात होते. हेच व्हॉट्सअॅप पाहून पती आलोक मौर्या यांना आपल्या पत्नीवर शंका आली. यानंतर मनीष दुबेवरुन दोघांमध्ये नेहमी भांडणे होऊ लागली. प्रकरणाला सार्वजनिक का केले - पण जेव्हा आलोक मौर्या यांना माहिती झाले की, पत्नी ज्योती मौर्या आणि तिचा तथाकथित प्रेमी होमगार्ड कमांडेंट मनीष दुबे त्याची हत्या करणार आहेत, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री यांच्या जनता दरबारमध्ये धाव घेतली. तसेच डीजी होमगार्ड बीके मौर्या यांच्याकडेही तक्रार केली. याप्रकरणाची चौकशी मे महिन्यात डीजी होमगार्ड बीके मौर्या यांनी डीआईजी होमगार्ड संतोष कुमार सुचारी यांच्याकडे सोपविली. तपासात सर्वात आधी तक्रारदार पतीचा जबाब घेण्यात आला. यामध्ये आलोक यांच्यावतीने मोठ्या संख्येत व्हॉट्सअॅप चॅट आणि शेकडो ऑडियो रेकॉर्डिंग सादर करण्यात आले. यासोबतच पत्नीच्या डायरीची काही पानेही त्यांनी दिली. यामध्ये कामाच्या बदल्यात लाच घेण्याचा दावा पतीकडून करण्यात आला. पतीने आपल्या जबाबात सांगितले की, कशाप्रकारे आपली पत्नी अनेक तास मनीष दुबेसोबत बोलायची. इतकेच नव्हे तर ज्यावेळी कार्यालयात कामाची वेळ असायची तेव्हासुद्धा दोन्ही जण अनेक तास फोनवर बोलायचे. दोघांचे कॉल डिटेल्स काढण्यात आली तर हा प्रकार समोर येईल, असे आलोक मौर्याने म्हटले. हॉटेलमध्ये भेटायचे ज्योती आणि मनीष - त्यांनी एका व्हॉट्सअॅप चॅटही दाखवले की, ज्यामध्ये दोघांनी एकमेकांना आयलव्हयू असे लिहिले आहे. यासोबतच सर्वात मोठा खुलासा आलोक मौर्याने केला आहे. आलोक मौर्या म्हणाले की, मनीष दुबे प्रयागराज यायचे आणि दोन्ही हॉटेलमध्ये एकांतात भेटायचे. व्हॉट्सअॅप चॅटमध्ये एका जागी एक संकेत ज्योती मौर्याच्या वतीने मनीष दुबेला पाठवण्यात आला होता, याचा अर्थ आलोक मौर्याने सांगितले की, संबंध बनवण्यासाठी सुरक्षा कवच आणण्यासाठी ज्योतीने मनीषला सांगितले. याप्रकारचे अनेक खुलासे आलोक मौर्याकडून करण्यात आले आहे. तर दुसरीकडे ज्योती मौर्या यांना आपला जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आले असता त्यांनी आपल्याला सुट्टी मिळाली नाही, असे सांगितले आहे. पण जबाब नोंदवणार असे त्या म्हणाल्या होत्या. UPSCमध्ये किती पेपर असतात माहित नसेल आणि…, ज्योती मौर्यच्या प्रियकराने साधला निशाणा यानंतर त्यांनी डीआईजी होमगार्ड संतोष कुमार सुचारी यांना लिखित स्वरुपात आपला जबाब दिला होता. यामध्ये त्यांनी मनीष दुबेसोबत संवाद आणि व्हॉट्सअॅप चॅट केल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यांनी यासोबतच असे लिहिले की, त्यांचे पती आणि सासरची लोकं त्यांच्याकडे हुंडा मागत होते. त्यांच्याकडे 40 लाख रुपये आणि फॉर्च्युनर गाडीची मागणी केली जात होती. याप्रकरणी धूमनगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासोबतच प्रयागराजच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दिला असल्याचेही त्यांनी आपल्या लिखित जबाबात म्हटले आहे. मनीष दुबेचे अन्य महिलांसोबत संबंध - तर यासोबतच होमगार्ड कमांडंट मनीष दुबे यांचाही जबाब घेण्यात आला आहे. तर मनीष दुबेने आपल्या संबंध असल्याची बाब स्वीकार केली आहे. मात्र, यादरम्यान, तपासात मनीषचे आणखी इतर महिलांशीही संबंध असल्याचा खुलासा झाला आहे. तपास समोर आले आहे की, मनीष दुबेने 2021 मध्ये तनु पराशर सोबत प्रेमविवाह केला होता. लग्नाआधी तनुकडून मनीषने 6 लाख रुपये घेतले होते. मनीष दुबेची पत्नीने आपल्या जबाबात म्हटले की, मनीष तिला 80 लाख रुपये मागत होता. तसेच तनुच्या नावावर जो फ्लॅट आहे तो सुद्धा आपल्या नावावर करण्यासाठी दबाब टाकत होता. मात्र, तनुला त्याच्या वाईट विचार लक्षात आला आणि तिने त्याला पैसे द्यायला तसेच फ्लॅट आपल्या नावावर करायला नकार दिला. मात्र, यामुळे यानंतर 15 ते 20 दिवसांतच दोन्ही जण वेगळे राहू लागले. तसेच मनीषने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दिला आहे. डीआईजी होमगार्डच्या तपासात अमरोहा येथील एका महिला होमगार्डचा जबाब नोंदवण्यात आला आहे. महिला होमगार्डने मनीष दुबेवर संबंध बनवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. पीडिता होमगार्डनेही आपला जबाब नोंदवला आहे. तिने आरोप केला आहे की, मनीष दुबे तिला सातत्याने बोलवायचे आणि तिला मानसिक त्रास द्यायचे. जेव्हा तिने मनीषचे ऐकले नाही तेव्हा त्याने निलंबित करुन टाकले आणि तिला मानसिक त्रास देण्यात आला. मात्र, नंतर डीजी होमगार्डसमोर महिला होमगार्ड सादर झाली आणि तिला पुन्हा सेवेत घेण्यात आले. आयपीएस अधिकाऱ्याच्या माजी पत्नीशीही मनीष दुबेचे संबंध - यासोबतच यूपी कॅडरच्या एका आयपीएस अधिकाऱ्याच्या पूर्व पत्नीच्या सोबतसुद्धा होमगार्ड कमांडंट मनीष दुबेचे संबंध असल्याचा खुलासा झाला आहे. डीआईजी होमगार्ड यांच्या तपासात आयपीएस अधिकाऱ्याच्या पूर्व पत्नीचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. झाशीच्या रहिवासी असलेल्या एका मुलीचेही शोषण केल्याचा आरोप मनीष दुबेवर आहे. या मुलीने तपासात सांगितले की, फेसबुकच्या माध्यमातून त्याची मैत्री झाली. यानंतर लग्नाचे आमिष देऊन मनीष दुबेने तिच्यासोबत 2 वर्ष शारिरीक संबंध ठेवले. दरम्यान, डीआईजी होमगार्ड यांनी तपासातून या मुलीचे नाव काढले आहे, कारण या मुलीचे लवकरच लग्न होणार आहे. दरम्यान, डीआईजी होमगार्ड संतोष कुमार सुचारी यांच्या तपास अहवालानंतर डीजी होमगार्ड बीके मौर्य यांनी महोबा येथे तैनात असलेला होमगार्ड कमांडंट मनीष दुबेला निलंबित करण्याची शिफारस केली होती. यानंतर त्याला निलंबित करण्यात आले. मात्र, याप्रकरणी अद्याप ज्योती मौर्याच्या विरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे याप्रकरणी अनेक जण आणखी प्रश्न उपस्थित करत आहेत.