मध्यप्रदेश, 20 नोव्हेंबर: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिहोर येथील एका लव्ह (Love Story) स्टोरीचा दुःखद अंत झाला आहे. भोपाळच्या रातीबाड भागात वडिलांनी बलात्कारानंतर महिलेची हत्या केली होती. आता तिच्या पतीने आत्महत्या केली आहे. यानंतर संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाल्यानंतर एका लव्ह स्टोरीचा अंत झाला आहे. सिहोरचे SSP समीर यादव यांनी सांगितले की, ‘इछावर पोलीस स्टेशनला माहिती मिळाली होती की, कालापीपल जागीर गावात 21 वर्षीय मुकेश विश्वकर्माने घरात गळफास लावून घेतला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. प्राथमिक तपासात मृताने दीड वर्षांपूर्वी बिल्किसगंज गावात राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमविवाह केल्याचं समोर आलं आहे. हेही वाचा- रक्तरंजित संध्याकाळ! माहेरी आलेल्या मुलीला घराबाहेर बोलावून घातल्या गोळ्या काय आहे नेमकी घटना मुकेश कामानिमित्त रायपूरला गेला होता. अलीकडेच भोपाळमधील रतीबाद भागातील समसगडच्या जंगलात मुकेशच्या पत्नीचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी मृत मुकेशच्या सासरच्या मंडळींवर मुलीच्या हत्येचा आरोप आहे. पत्नीची हत्या आणि मुलाचा मृत्यू झाल्यापासून मुकेश हा धक्क्यात आणि नैराश्यात असल्याचे कुटुंबीयांच्या चौकशीत समोर आले आहे. हेही वाचा- देशाची राजधानी अजूनही Air Pollution च्या विळख्यात, आजही वाईट हवा काही दिवसांपूर्वी समसगडच्या जंगलात एक महिला आणि मुलाचा मृतदेह सापडल्याची माहिती रतीबाद पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासात महिलेची हत्या तिच्या वडिलांनीच केल्याचे निष्पन्न झाले. प्रेमविवाह केल्याचा राग आल्यानं वडिलांनी मुलीची हत्या केल्याची कबुली वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.