डबरा मतदारसंघात इमरती देवी या उमेदवार महिलेला उद्देशून कमलनाथ यांनी अपमानास्पद भाषा वापरली. त्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. 48 तासांत कमलनाथ यांनी याचं उत्तर द्यावं अशी अपेक्षा होती. पण कमलनाथ यांनी माफी मागितली नाही. राहुल गांधी यांनीसुद्धा "कमलनाथ आमच्या पक्षाचे असले तरी त्यांनी वापरलेली भाषा मला अजिबात पसंत नाही", अशी प्रतिक्रिया दिली होती. यावरही कमलनाथ यांनी माफी न मागता, राहुल गांधी यांचे वैयक्तिक विचार असल्याचं सांगितलं. आता निवडणूक आयोगाने आणखी कठोर कारवाई करत त्यांचा स्टार प्रचारक असल्याचा दर्जा काढून घेतला आहे. स्टार प्रचारकांच्या यादीतल्या नेत्यांचा प्रचारखर्च, त्यांचा प्रवास, राहणं, विमानाचा प्रवास हे पक्षाच्या खात्यात धरता येतं. पण आता कमलनाथ यांना घेऊन कुठल्या मतदारसंघात प्रचार करण्यात आला तर तो खर्च पक्षाच्या नव्हे तर उमेदवाराच्या वैयक्तिक खात्यातून केल्याचं धरलं जाईल. यामुळे उमेदवारावरचा दबाव वाढेल. उमेदवाराला प्रचारावर किती खर्च करायचा यावरसुद्धा आदर्श आचारसंहितेत मर्यादा असल्यामुळे मध्य प्रदेशात कमलनाथ यांची चांगलीच अडचण होणार आहे.If any campaign is done by Kamal Nath from now onwards, the entire expenditure will be borne by the candidate in whose constituency campaign is being undertaken, says Election Commission. https://t.co/M0N1tcfoV7
— ANI (@ANI) October 30, 2020
दरम्यान नुकत्याच आलेल्या बातमीनुसार, काँग्रेस निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार आहे. काँग्रेसच्या मध्य प्रदेस प्रभागाचे माध्यम समन्वयक नरेंद्र सलुजा म्हणाले, कमलनाथ यांच्या स्टार कँपेनरचा दर्जा काढून टाकल्याप्रकरणी आम्ही कोर्टात दाद मागणार आहत.Congress party to move court against Election Commission's revocation of party leader Kamal Nath's star campaigner status: Narendra Saluja, media coordinator for Madhya Pradesh unit of Congress https://t.co/M0N1tcfoV7
— ANI (@ANI) October 30, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kamal nath, Madhya pradesh