नवी दिल्ली, 16 जुलै : देशातील काही राज्यांत वाढत्या कोरोनाच्या (Corona) रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकारची चिंता कायम आहे. यामुळेच आज स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या प्रकरणी एक महत्त्वाची बैठक घेतली. ज्या राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे अशा सहा राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांनी बैठक घेतली. यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra), तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश होता. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचा सल्ला दिला.
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात कोरोनाचे एकूण रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण आणि मृत्यू हे केवळ याच राज्यात झाले आहेत. त्यामुळे तातडीने योग्य ती पावलं उचलणं आवश्यक आहे. कोविड आपत्कालीन प्रतिसाद अंतर्गत 23 हजार कोटींचा निधी ठेवण्यात आला आहे. याचा उपयोग आरोग्य सेवांमध्ये केला पाहिजे. ग्रामीण भागांत अधिक लक्ष देणे आवश्यक आहे असा सल्लाही यावेळी पंतप्रधानांनी दिला आहे.
The govt of India has announced a Rs 23,000 crore emergency response package to combat COVID19. The States must use funds from this package to strengthen health infrastructure. Infrastructural gaps need to be filled. There is also a need to focus on rural areas: PM Modi
— ANI (@ANI) July 16, 2021
पंकजा मुंडेंना मोठा झटका; साखर कारखान्याचे बँक खाते सील
सर्व मुलांचे संरक्षण व्हायला हवे. राज्यांतील रुग्णालयात असलेल्या बेड्सची संख्या वाढवावी लागणार आहे आणि आरोग्य यंत्रणांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, राज्यांनी आपला डेटा पारदर्शक पद्धतीने सार्वजनिक करायला हवा. यावेळी पंतप्रधानांनी सर्व सहा राज्यांना कटोर सूचना दिल्या की, कोणत्याही परिस्थितीत तिसरी लाट येणं टाळलं पाहिजे. तज्ञांनी हे स्पष्ट केले आहे की, जर परिस्तिती सुधारली नाही तर खूप गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. ज्या देशांची परिस्थिती कोरोनामुळे गंभीर होत आहे अशा देशांची उदाहरणेही यावेळी पंतप्रधानांनी दिली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Narendra modi, Uddhav thackeray