केरळ, 6 नोव्हेंबर : केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केरळ पोलिसांनी तिघांना अटक केली असून यांच्यावर कोचीतील डॉक्टरांना ब्लॅकमेल करुन पैसे उकळण्याचा आरोप आहे. या तिघांनी डॉक्टरांचे महिलेसोबतचे न्यूड फोटो क्लिक केले आहेत. हे फोटो दाखवून डॉक्टरांकडून पैसे उकळवण्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी 22 (महिला), 23 आणि 25 वय वर्षीय तरुणांना अटक केली आहे. त्याशिवाय यामध्ये अजमल आणि विनेश यांचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 21 ऑक्टोबर रोजी घडली आहे. डॉक्टर कोची येथे एका खासगी रुग्णालयात काम करतात. डॉक्टरांनी खोट्या जमिनीच्या कराराबद्दल चर्चा करण्यासाठी इडापल्ली येथील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. यावेळी डॉक्टरांसोबत आरोपीचाही साथीदार होता. या फेक डिलमध्ये आरोपी अजमल हा डॉक्टरांच्या संपर्कात होता.
हे ही वाचा-पती आणि मुलासह सेल्फी घेताना महिलेचा पाय घसरला; 1000 फूट दरीत सापडला मृतदेह
हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर आरोपीने बंदूकीचा धाक दाखवायला सुरुवात केली. यानंतर त्याने डॉक्टरांना कपडे काढण्यास सांगितले व महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओ शूट केला. त्यानंतर या गँगने डॉक्टरांकडून फोटो व व्हिडीओ दाखवून 5 लाखांची मागणी केली. अन्यथा हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याबरोबरच बायकोला दाखविण्याची धमकी दिली. डॉक्टरांनी याबाबत तक्रार केली असून यामध्ये त्यांना मारहाण केल्याचेही नमूद केले आहे. डॉक्टरांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या तिघांना अटक केली आहे. यापूर्वी या गँगमधील आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी त्याच्यावर एका ज्वेलरी शॉपच्या मालकाचे न्यूड फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप होता.