Home /News /national /

महागाईचा झटका, पेट्रोल डिझेल आणि दुधानंतर गॅस सिलेंडरही महागला, मोजावी लागणार इतकी किंमत

महागाईचा झटका, पेट्रोल डिझेल आणि दुधानंतर गॅस सिलेंडरही महागला, मोजावी लागणार इतकी किंमत

LPG Price

LPG Price

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळं (Russia Ukraine War) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी (Crude Oil Price) उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी मंगळवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या(LPG Price) दरात वाढ केली.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 22 मार्च:  रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळं (Russia Ukraine War) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी (Crude Oil Price) उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी मंगळवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या(LPG Price) दरात वाढ केली. याआधीही कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ केली होती. याच्या काही दिवसांपूर्वी प्रमुख दूध कंपन्यांनी दुधाचे दर प्रतिलिटर दोन ते पाच रुपयांनी वाढवले ​​होते. 14.2 किलो घरगुती स्वयंपाकाच्या गॅस एलपीजीच्या दरात प्रति सिलेंडर 50 रुपयांनी वाढ झाली आहे. आता आजपासून 949.50 रुपये मोजावे लागतील. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 976 रुपयांपर्यंत वाढली आहे. यापूर्वी कोलकाता येथे त्याची किंमत 926 रुपये होती. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये किंमत 938 रुपयांवरून 987.5 रुपयांपर्यंत वाढली आहे. पाटणामध्ये 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 998 रुपयांवरून 1039.5 रुपयांवर पोहोचली आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: LPG Price, Russia Ukraine

    पुढील बातम्या