फगवाडा, 25 एप्रिल : पंजाबमधील फगवाडा याठिकाणच्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (Lovely Professional University) वादात सापडली आहे. येथील एका सहाय्यक महिला प्राध्यापकाने भगवान राम (Lord Ram) यांच्याविरोधात अपमानजनक भाषेचा वापर करत अनेक वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. तसेच यासंबंधीचा ऑडिओ (LPU Controversial Audio) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गुरसंग प्रीत कौर असे या प्राध्यापिकेचे नाव आहे. प्रभू रामाबद्दल अपमानास्पद भाषा - लवली प्रोफेशनल यूनिव्हर्सिटीच्या सहाय्यक प्राध्यापिका गुरसंग प्रीत कौर यांच्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. सहायक प्राध्यापिकेला विद्यापीठ प्रशासनाने बडतर्फ करावे, अशी मागणीही अनेकांनी लावून धरली. यानंतर विद्यापीठ प्रशासनाने शनिवारी अपशब्द वापरल्याप्रकरणी प्राध्यापिकेला बडतर्फ करण्याचा आदेश जारी केला. गुरुसंग प्रीत कौरने भगवान राम यांच्याबद्दल अपशब्द वापरत रावण चांगला माणूस होता. पण रामाने त्याची फसवणूक केल्याचे सांगितले. ती इतक्यावर थांबली नाही तर पुढे म्हणाली की, ‘सीतेला पळवून नेण्याची योजना रावणाची नसून रामाची असल्याचे सांगितले. असे करून रामाला त्याचा शत्रू रावणाला जाळ्यात अडकवायचे होते.’
Hi @lpuuniversity how your professor Gursang Preet Kaur still working with you after abusing about Hindu gods.. i was think this is the correct time to #boycottLPU pic.twitter.com/qSMQmFjt1H
— Prince Sharma (@alwyssmile16) April 23, 2022
विद्यापीठाचे काय म्हणणे? सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमुळे काही लोक दुखावले गेल्याचे आम्हाला समजते. ज्यामध्ये आमचा एक फॅकल्टी सदस्य त्याचे वैयक्तिक मत मांडताना ऐकू येत आहे, असे लवली प्रोफेशनल यूनिव्हर्सिटीने याबाबत निवेदन जाहीर करत म्हटले. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की त्यांनी केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत आणि विद्यापीठ त्यापैकी कोणाचेही समर्थन करत नाही," असे निवेदनात म्हटले आहे. आम्ही नेहमीच एक धर्मनिरपेक्ष विद्यापीठ आहोत, जिथे सर्व धर्म आणि धर्माच्या लोकांना समान प्रेम आणि आदराने वागवले जाते. त्यांना तत्काळ सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. तथापि, या संपूर्ण घटनेबद्दल आम्हाला मनापासून खेद वाटतो.