जाहिरात
मराठी बातम्या / देश / शाइस्ता फरार, चर्चा दोघांच्या लव्ह स्टोरीची; सिक्रेट कहाणी कोणालाच माहिती नाही

शाइस्ता फरार, चर्चा दोघांच्या लव्ह स्टोरीची; सिक्रेट कहाणी कोणालाच माहिती नाही

अतिक अहमद, शाइस्ता यांची ‘लव्ह स्टोरी’

अतिक अहमद, शाइस्ता यांची ‘लव्ह स्टोरी’

अतिकच्या घरातून नुकताच सापडलेल्या अल्बमवरूनही त्याचं त्याच्या बायकोवर किती प्रेम होतं, हे दिसून येतं.

  • -MIN READ Trending Desk Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

    दिल्ली, 10 मे : उत्तर प्रदेशात गुंडगिरीच्या माध्यमातून स्वतःचं आर्थिक व राजकीय साम्राज्य उभारणारा कुख्यात बाहुबली अतिक अहमद व त्याचा भाऊ अशरफ या दोघांची एप्रिल 2023 मध्ये प्रयागराज येथे हत्या करण्यात आली. त्यानंतर अतिक अहमदच्या गुन्हेगारी व राजकीय विश्वातील प्रवासाबद्दल तुम्ही ऐकलं असेल, किंवा वाचलंसुद्धा असेल. पण आज आम्ही तुम्हाला अतिक आणि त्याची पत्नी शाइस्ता यांच्या लव्ह स्टोरीबाबत माहिती देणार आहोत. आतिकचं प्रेम कसं फुलतं गेलं ते जाणून घेऊ. वर्ष 1996 मध्ये अतिकनं स्वतःचे गुन्हे लपवण्यासाठी राजकारणात प्रवेश केला होता. तो आमदार होता. तेव्हा जवळपास 34 वर्षांचा असणाऱ्या अतिकचं चकिया परिसरात मोठं नाव आणि प्रतिष्ठा होती. तर, शाइस्ताचं कुटुंब प्रयागराजच्या दामुपूर येथे राहत होतं. वडील पोलिसात नोकरी करायचे. अतिकनं शाइस्ताशी लग्न करावं, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे अतिक व शाइस्ताचं लग्न व्हावं, असा प्रस्ताव शाइस्ताचे कुटुंबीय अतिकच्या घरी घेऊन गेले. शाइस्ता ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत होती, आणि अभ्यासात चांगली होती. अतिकची जेव्हा शाइस्ताशी ओळख झाली, तेव्हा अतिक पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडला. असं म्हटलं जातं की, शाइस्ता ही खूप रागीट मुलगी होती. अतिकला शाइस्ताचा रागीटपणाच जास्त आवडला. तसंच अतिकला आनंद झाला होता की, तो आठवी पास आहे आणि शाइस्ता ग्रॅज्युएशन झालेली आहे. तेव्हाच अतिक हा शाइस्ताच्या प्रेमात पडला. अतिक आणि शाइस्ता यांचा विवाह 2 ऑगस्ट 1996 रोजी झाला. पोलीस क्वार्टरमध्ये राहणारी शाइस्ता एकप्रकारे अतिकच्या अलिशान घरातील राणी बनली होती. अतिकचं शाइस्तावर खूप प्रेम होतं. असं म्हणतात की, शाइस्ताला खूश करण्यासाठी तो तिला अनेकदा महागड्या भेटवस्तू देत असे आणि तिला त्या आवडत. शाइस्ताला सर्वात जास्त आवडलेली एक भेट म्हणजे कोल्ड स्टोरेज. या कोल्ड स्टोरेजला शाइस्ता गोल्ड स्टोरेज म्हणत असे. या कोल्ड स्टोरेजच्या मालकाला ते शाइस्ताच्या नावावर करण्यासाठी अतिकनं जबरदस्तीनं भाग पाडलं होतं. या कोल्ड स्टोरेजमधून शाइस्ता दरवर्षी सुमारे 3 कोटी रुपये कमवत असे. कर्नाटकात मतदानासाठी नाग, माकड, मांजर पोहोचले; महिलेला करायची होती ईव्हीएमची पूजा, पाहा खास Photos अतिकच्या घरातून नुकताच सापडलेल्या अल्बमवरूनही त्याचं त्याच्या बायकोवर किती प्रेम होतं, हे दिसून येतं. अतिक आणि शाइस्ता यांना पाच मुलं आहेत. अतिक तुरुंगाबाहेर असतानाही शाइस्ता घराची बॉस होती, आणि तुरुंगात गेल्यावर शाइस्ताच अतिकचा संपूर्ण व्यवसाय सांभाळत होती. अतिकने अनेकांना त्याच्या तालावर नाचवलं, पण घरामध्ये तो बायकोच्या तालावर नाचायचा, अशीही चर्चा होती. अतिक आणि शाइस्ता यांची ही लव्ह स्टोरी आहे, ज्याबद्दल फार लोकांना माहिती नाही. पण एक सत्य हेही आहे की, या लव्ह स्टोरीत दोघेही गुन्हेगार आहेत. अतिकसाठी माफिया हा शब्द वापरला जायचा, आता शाइस्तालाही माफिया घोषित करण्यात आलं आहे. सध्या ती फरार असून तिच्याबाबत माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस घोषित करण्यातं आलंय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात