लव्ह, सेक्स आणि गर्भवती! महिला कॉन्सेटबलची अशी फसवणूक की 4 वर्षात खेळ खल्लास

लव्ह, सेक्स आणि गर्भवती! महिला कॉन्सेटबलची अशी फसवणूक की 4 वर्षात खेळ खल्लास

महिला कॉन्स्टेबलच्या आयुष्यात असं घडलं की गर्भवती असतानाच तिने गळफास लावून आत्महत्या केली

  • Share this:

आजमगढ, 26 फेब्रुवारी : प्रेमात धोका हे काही नवं नाही. मात्र या प्रकरणात फक्त धोका दिला नाही तर लाखो रुपयांची हेराफेरी करण्याबरोबरच आत्महत्या करण्यासाठी उद्दीपित करण्याचा आरोप आहे. या प्रकरणातील मिळालेली माहिती अशी, की एका अशिक्षित तरुणाने स्वत:ला बँक मॅनेजर असल्याचे फसवून महिला कॉन्स्टेबलशी लग्न केले आणि चार वर्ष तिच्यासोबत राहिला. यापुढे जाऊन महिलेचे चार लाख रुपये आणि एक कारदेखील चोरली. पुढे तर त्याने फसवणुकीची परिसीमाच गाठली. महिला कॉन्स्टेबल गर्भवती राहिल्यानंतर त्याने कुटुंबीयांसमोर महिलेचा स्वीकार करण्यास नकार दिला.

पत्नीने केली आत्महत्या

हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने आत्महत्या केली. यामध्ये तिच्या गर्भात असलेल्या बाळाचाही मृत्यू झाला. महिलेच्या आत्महत्येनंतर जेव्हा पोलिसांनी तिचा मोबाइल तपासला तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली व त्याला तुरुंगात पाठवले.

चॅट हिस्ट्रीमुळे पोल खोल

चंदौली जिल्ह्यातील चकिया ठाणे परिसरात शाहमदपूर गावातील निवासी पूजा सिंह 2018 बॅचची महिला कॉन्स्टेबल होती. ती फेब्रुवारी 2019 पासून फूलपूर पोलीस ठाण्यात रुजू झाली होती. ती फूलपूर कस्बामधील स्टेट बँकेजवळ भाडेतत्वावर राहत होती. पूजाचा मृतदेह 7 फेब्रुवारी रोजी घरात फासावर लटकलेल्या अवस्थेत होता. त्यावेळी पूजाचा मोबाइल स्विच ऑफ असल्याकारणाने पोलिसांना पुरावा सापडत नव्हता. मात्र मोबाइलची चॅट हिस्ट्री समोर आल्यानंतर पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

हेही वाचा -पुण्यातील सहकारी बॅंक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदारासह चौघांना अटक

बँक मॅनेजरचा ड्रायव्हर होता आरोपी

एएसपी ग्रामीण नागेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार कॉन्स्टेबलचा पती अविनाश कुमार वाराणसीयेथील लंकेत राहणारा होता. चार वर्षांपूर्वी 2016 मध्ये जेव्हा पूजा वाराणसीमध्ये शिक्षण घेत होती तेव्हा आरोपी बँक मॅनेजरची गाडी चालवित असे. त्यादरम्यान त्याची पूजाशी भेट झाली. यावेळी त्याने आपण स्वत: बँक मॅनेजर असल्याचे पूजाला सांगितले आणि पूजाला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. यादरम्यान 2018 मध्ये यूपीत पोलीस भरती झाली. यानंतर पूजा फूलपुर ठाण्यात रुजू झाली. यातच दोघांनी लग्नही केले. स्वत:ला अविनाशची पत्नी मानून पूजाने त्याला लोन घेऊन नवीन कार घेऊन दिली आणि पाच लाख रुपये पण दिले. यादरम्यान पूजा गर्भवती झाली. यानंतर अविनाश तिच्यापासून अंतर ठेवून राहू लागला. पूजाने याबाबत दबाव आणल्यानंतर त्याने कुटुंबीयांसमोर पूजाला आणि तिच्या गर्भातील बाळाला स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे पूजाला धक्का बसला होता. हे सहन न झाल्याने पूजाने आत्महत्या केली व स्वत:सह बाळाला संपवलं. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

First published: February 26, 2020, 9:08 AM IST

ताज्या बातम्या