जाहिरात
मराठी बातम्या / देश / Love Marriage करून नशीब फळफळलं; 21 वर्षांची जानकी बिनविरोध झाली सरपंच!

Love Marriage करून नशीब फळफळलं; 21 वर्षांची जानकी बिनविरोध झाली सरपंच!

Love Marriage करून नशीब फळफळलं; 21 वर्षांची जानकी बिनविरोध झाली सरपंच!

जानकीचा सरपंच होण्यामागील प्रवासही फार रंजक आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 17 जून : 21 वर्षीय जानकी गोंड ही मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) सागर जिल्ह्यातील ग्राम पंचायत नाहरमऊ येथे राहणारी आहे. तिला गावकऱ्यांनी बिनविरोध सरपंच बनवलं आहे. या निवडणुकी मागील कहाणीही मजेशीर आहे. जानकीने चार वर्षांपूर्वी गौरव पटेलसोबत प्रेम विवाह केला होता. त्यात यंदा पंचायत निवडणुकीत नाहरमऊ ग्राम पंचायतीत (Love Marriage made Sarpanch) अनुसूचित जातीतील महिलांसाठी आरक्षित होता. संपूर्ण गावात केवळ जानकीच या आरक्षणाअंतर्गत येत होती. त्यामुळे सरपंचाच्या जागी तिची निवड निर्विरोधपणे करण्यात आली. याशिवाय पंचाची निवडदेखील निर्विरोधपणे करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील आदिवासी विकासखंड केसलीमध्ये नाहरमऊ गाव आहे. या गावात 21 वर्षीय महिला जानकी गोंड हिला गावकऱ्यांनी निर्विरोध सरपंच म्हणून निवडलं आहे. 4 वर्षांपूर्वीच जानकीचं नाहरमऊ येथे राहणाऱ्या गौरव पटेलसोबत प्रेम विवाह झाला होता. त्यांचं आयुष्य नीट सुरू होतं. आता थेट सरपंच म्हणून निवड झाल्यानंतर जानकी म्हणते, तिने कधी याबद्दल विचारही केला नव्हता. देवाची हिच इच्छा होती, म्हणून गोष्टी आपोआप घडत गेल्या. ग्राम पंचायत नाहरमऊची जागा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आली होती. यानंतर जेव्हा गावात सरपंचाच्या उमेदवाराचा शोध सुरू झाला, तर केवळ जानकी या एकाच महिलेचं नाव समोर आलं. कारण संपूर्ण गावातून ती एकमेक या आरक्षणाअंतर्गत बसत होती. शेवटी गावकऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी जानकीला बळ दिलं. आणि निर्विरोधपणे तिची सरपंच म्हणून निवड केली. जानकीला  जिल्ह्यातील सर्वात कमी वयात सरपंच होण्याची संधी मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात