मराठी बातम्या /बातम्या /देश /पुन्हा दाखवून दिलं, 'हम एक है!' हिंदू-मुस्लीमच्या नावाने फूट पाडणाऱ्या राजकीय नेत्यांना चपराक

पुन्हा दाखवून दिलं, 'हम एक है!' हिंदू-मुस्लीमच्या नावाने फूट पाडणाऱ्या राजकीय नेत्यांना चपराक

सध्या देशभरात हिंदू-मुस्लिमांमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भावना स्पष्ट, प्रामाणिक आणि एकमेकांसोबत चालणारी आहे.

सध्या देशभरात हिंदू-मुस्लिमांमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भावना स्पष्ट, प्रामाणिक आणि एकमेकांसोबत चालणारी आहे.

सध्या देशभरात हिंदू-मुस्लिमांमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भावना स्पष्ट, प्रामाणिक आणि एकमेकांसोबत चालणारी आहे.

पाटना, 1 मे : बिहारची (Bihar News) राजधानी पाटनामध्ये परस्पर सौहार्द आणि बंधुभावाचे उदाहरण पाहायला मिळाले. रविवारी पाटनाच्या हनुमान मंदिरात सुरू असलेला लाऊडस्पीकर अजानच्या वेळी बंद करण्यात आला. मशीद आणि मंदिरदरम्यान 50 मीटर अंतर आहे. तर एकमेकांप्रती सन्मान दर्शवित मशिदीने मंदिरात येणाऱ्या भक्तांची काळजी घेतली. सध्या देशभरात मशिदीवर वाजणाऱ्या लाऊडस्पीकरवरुन वादंग असताना सर्व राजकीय नेत्यांसह विभाजन करू पाहणाऱ्यांना हे सणसणीत प्रत्युत्तर आहे.

भाजप बिहारमध्ये उत्तर प्रदेशाप्रमाणे लाऊडस्पीकर हटविण्यासाठी मागणी करीत आहे. नितीश सरकारमध्ये मंत्री जनक रामने मशिदीमध्ये लावलेल्या लाऊडस्पीकरवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी मशिदीच्या लाऊडस्पीकरमधून येणाऱ्या अजानच्या आवाजावर रोख लावाण्याची मागणी केली होती.

हे ही वाचा-कसं शक्य आहे? भारतातील या गावात अनेक जमिनींचे मालक आहे पाकिस्तानी नागरिक

ते म्हणाले की, जेव्हा होळी, दिवाळी आणि डीजे वा मोठा आवाज करणाऱ्या गाड्यांवर निर्बंध आणले जातात, तर मशिदीमधील लाऊडस्पीकरमधून येणाऱ्या अजानवरही निर्बंध आणणे आवश्यक आहे. मंत्र्यांचं म्हणणं आहे की, लोक प्रतिनिधी या नात्याने माझ्याकडे याबाबत तक्रारी आल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे मत याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. आपल्या विचारांची सर्वांना जाणीव आहे असे ते म्हणतात. आम्ही कधीही कोणत्याही धर्मात ढवळाढवळ करत नाही. यापूर्वी त्यांनी लाऊडस्पीकर हटवण्याबाबत मूर्खपणा असल्याचे म्हटले होते. बिहारमधील धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्याबाबत बोलण्यात अर्थ नाही, असे ते म्हणाले होते. प्रत्येकाला त्याच्या धर्माचे पालन करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

First published:
top videos

    Tags: Hanuman mandir, Uttar pardesh