भुवनेश्वर, 24 नोव्हेंबर : लग्न असो किंवा बर्थडे हल्ली बहुतेक कार्यक्रमात डीजे (DJ) वाजवला जातो. डीजेचा आवाज इतका असतो की त्याचा भयंकर त्रास होतो. अनेक माणसांना डीजेचा आवाज सहनही होत नाही (Loud DJ music). अशात पक्ष्यांनाही डीजेच्या आवाजाचा मोठा फटका बसल्याचं एक प्रकरण समोर आलं आहे. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे चक्क कोंबड्या दगावल्या आहे (Loud dj music killed 63 chickens). ओडिशातील (Odisha) एका पोल्ट्री फार्मच्या मालकाने आरोप करत पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
बालासोरमधील रंजीत कुमार परिदाने यांनी डीजेमुळे आपल्या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. रविवारी रात्री लग्नाची वराच त्याच्या पोल्ट्री फार्मजवळून गेली. त्याचा त्रास कोंबड्यांना झाला आणि 63 कोंबड्या दगावल्याचा आरोप परिदाने केला आहे.
एएफशी बोलताना परिदाने सांगितलं की, त्याने डीजेचा आवाज कमी करण्यास सांगितलं कारण आवाज खूप होत होता. त्यामुळे कोंबड्या घाबरत होत्या. पण त्यांनी त्याचं काहीच ऐकलं नाही. नवरा त्याच्या मित्रांवरच ओरडू लागला. जास्त आवाजामुळे मी जवळपास 180 किलो चिकन गमावलं आहे कारण कोंबड्यांचा कदाचित धक्क्यामुळे मृत्यू झाला.
हे वाचा - बापरे! 19 व्या मजल्यावरून वृद्धेचा तोल गेला आणि...; भयंकर दुर्घटनेचा Live video
प्राण्यांच्या एका डॉक्टराने परीदाला सांगितलं, कोंबड्याचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला. प्राण्यांवर पुस्तक लिहिणारे प्राणीतज्ज्ञ प्राध्यापक सूर्यकांच मिश्रा यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितलं की, जास्त आवाजामुळे पक्ष्यांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढतो. जास्त आवाजामुळे अचानक उत्तेजना आणि तणाव त्यांच्या जैविक वेळेला बाधित करू शकतं.
त्यानंतर परिदा लग्नाच्या आयोजकांकडे भरपाई मागण्यासाठी पोहोचला. आयोजकांनी भरपाई देण्यास मनाई केल्यानंतर त्याने पोलिसात तक्रार केली. नीलागिरी पोलीस ठाण्याच्या द्रौपदी दास यांनी सांगितलं की, त्यांनी परीदा आणि त्याच्या शेजाऱ्यांना जबाबासाठी बोलावलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.