मराठी बातम्या /बातम्या /देश /

भारतातलं 'हे' अनोखं गाव विभागलंय दोन देशांमध्ये; नागरिकांकडे आहे दुहेरी नागरिकत्व

भारतातलं 'हे' अनोखं गाव विभागलंय दोन देशांमध्ये; नागरिकांकडे आहे दुहेरी नागरिकत्व

हे गाव म्यानमार आणि भारत अशा दोन देशांमध्ये विभागलं गेलं आहे. तिथले नागरिक या दोन्ही देशांमध्ये अगदी सहजपणे फिरू शकतात.

हे गाव म्यानमार आणि भारत अशा दोन देशांमध्ये विभागलं गेलं आहे. तिथले नागरिक या दोन्ही देशांमध्ये अगदी सहजपणे फिरू शकतात.

हे गाव म्यानमार आणि भारत अशा दोन देशांमध्ये विभागलं गेलं आहे. तिथले नागरिक या दोन्ही देशांमध्ये अगदी सहजपणे फिरू शकतात.

मुंबई, 21 सप्टेंबर :  भारतात अशी अनेक रेल्वेस्थानकं किंवा ठिकाणं आहेत, जी दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागली गेली आहेत. या ठिकाणांचा निम्मा भाग एका राज्यात तर दुसरा भाग दुसऱ्या राज्यात आहे; पण भारतात एक असं अनोखं गाव आहे, जे भारतासह दुसऱ्या देशातही विभागलं गेलं आहे. यामुळे या गावातल्या ग्रामस्थांकडे दुहेरी नागरिकत्व आहे. ते आहे नागालॅंडमधलं एक गाव. तिथे एक अनोखी जमात वास्तव्य करते. हे गाव म्यानमार आणि भारत अशा दोन देशांमध्ये विभागलं गेलं आहे. तिथले नागरिक या दोन्ही देशांमध्ये अगदी सहजपणे फिरू शकतात. नागालॅंडमधलं लोंगवा हे गाव आपल्या खास वैशिष्ट्यामुळे प्रसिद्ध आहे. या गावात कोन्याक जमातीचे नागरिक वास्तव्य करतात. हे गाव भारत आणि म्यानमार अशा दोन देशांमध्ये विभागलं गेलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गावाची सीमा गावचे सरपंच आणि जमातीचे प्रमुख अर्थात राजाच्या घराजवळून जाते. त्यामुळे राजा आपल्या घरात म्हणजे म्यानमारमध्ये जेवतो आणि भारतात झोपतो असं म्हटलं जातं. `आउटलूक इंडिया`च्या वृत्तानुसार, तिथल्या राजाला अंघ असं म्हणतात. या राजाला 60 बायका आहेत. तो आपल्या गावाव्यतिरिक्त म्यानमार, नागालॅंड आणि अरुणाचल प्रदेशातल्या 100 गावांचा राजा आहे. हेही वाचा - लग्नाचे भुत डोक्यात; प्रेयसी प्यायली टॉयलेट क्लिनर तर विवाहित प्रियकराने काय केलं पाहा? शिरच्छेदाची होती प्रथा कोन्याक जमातीला हेडहंटर असं म्हटलं जात होतं. हेडहंटर म्हणजे या जमातीच्या व्यक्ती एकमेकांचा शिरच्छेद करून ते शिर घरात सजावटीसाठी घेऊन जायचे; पण 1960 पासून तिथे ख्रिश्चन धर्माचा प्रसार झपाट्यानं झाला आणि ती प्रथा हळूहळू बंद करण्यात आली. सीएन ट्रॅव्हलर वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, या गावात सुमारे 700 घरं आहेत आणि या जमातीची लोकसंख्या इतर जमातींपेक्षा जास्त आहे. तिथले ग्रामस्थ अगदी सहजपणे एका देशातून दुसऱ्या देशात जात असतात. एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्ट, व्हिसाची नाही गरज इतर जमातीच्या व्यक्तींपेक्षा वेगळं दिसण्यासाठी कोन्याक जमातीच्या व्यक्ती चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर टॅटू काढतात. टॅटू आणि हेडहंटिंग हा त्यांच्या परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. या जमातीच्या राजाचा मुलगा म्यानमारच्या सैन्यात भरती झाला आहे. तिथल्या नागरिकांना दोन्ही देशांमध्ये फिरण्यासाठी व्हिसा, पासपोर्टची गरज नाही. ते नागरिक नागा आणि आसामी भाषेपासून बनलेली नागमी भाषा बोलतात. दोन देशांमध्ये विभागलेलं हे गाव एक अनोखं असं म्हणावं लागेल.
First published:

Tags: Village

पुढील बातम्या