पुणे, 23 जुलै: पुण्यात आठही आमदार आमचे त्यामुळे सेनेला जागा मागण्याचा प्रश्नच नाही असं पाटलांनी स्पष्ट केलं. जी जागा आमची आहे त्यावर दावा काय सांगायचा असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा युतीमध्ये वादाची ठिणगी पडणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 'मी राजकीय अफवा पसरवतो तर अजित दादा माझ्या विधानांचा एवढा धसका का घेतात?' असा सवाल त्यांनी केला. तसंच पक्षानं आदेश दिला तर आपण निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं.