मुंबई, 23 मे : संपूर्ण देशाचं लक्ष लोकसभेच्या निकालाकडे लागलं आहे. दिग्गज लोकही निकालावर आपआपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यात बॉलिवूड कलाकारांनीही आपलं म्हणणं सोशल मीडियावर शेअर केलं आहेत. सध्या अभिनेत्री सनी लिओनीच्या ट्विटची चर्चा होत आहे. तिने सोशल मीडियावर मी किती मतांनी आघाडीवर आहे ? असा प्रश्न विचारला आहे. लोकसभेटच्या रणधुमाळीत तिच्या फिरकी घेण्याच्या अंदाजातील ट्विट व्हायरल होत आहे.
Leading by How many votes ???? ;)
— Sunny Leone (@SunnyLeone) May 23, 2019
भाजपक़डून पंजाबमधील गुरदासपुर मतदारसंघातून अभिनेता सनी देओलला उमेदवारी देण्यात आली होती. पहिल्यांदाच उभा राहिलेला सनी देओलला मोठी आघाडी मिळाली आहे. सनी देओलच्या मतदारसंघातील अपडेट सांगताना रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याकडून सनी लिओनीचा उल्लेख झाला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सनीने ट्विट केलं आहे.
Arnab is so excited today he goofed up Sunny Deol as Sunny Leone#Verdict2019 #ElectionResults2019 pic.twitter.com/SBDt1DEDoE
— Sir Jadeja fan (@SirJadeja) May 23, 2019
आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार एनडीए 347 जागांवर आघाडीवर आहे. तर निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकड्यांनुसार भाजप सध्या 292 जागांवर आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत. यातील 79 जागांचे कल हाती आले असून यातील तब्बल 52 जागांवर भाजपा आघाडीवर आहे.
भाजपची आघाडी पाहता काँग्रेसकडे 100 पेक्षा कमी जागा उरल्या आहेत. त्यांना शंभरी गाठणं कठीण दिसत आहे. यावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. 2014 ला मोदी लाट होती. ती लाट जाऊन आता मोदी त्सुनामी आल्याचंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
SPECIAL REPORT : निवडणूक आयोगाचा विरोधी पक्षांना मोठा झटका
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lok sabha election 2019, Punjab Lok Sabha Elections 2019, Sunny deol