तेज बहादूर यांना दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

वाराणसी लोकसभा मतदारसंघात महागठबंधनच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या तेज बहादूर यांचा अर्ज काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आला.

वाराणसी लोकसभा मतदारसंघात महागठबंधनच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या तेज बहादूर यांचा अर्ज काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आला.

  • Share this:
    नवी दिल्ली, 9 मे : बीएसएफचे बरखास्त जवान आणि वारणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात षड्डू ठोकणाऱ्या तेज बहादूर यांची उमेदवारीसंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर तेज बहादूर सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. वाराणसी लोकसभा मतदारसंघात महागठबंधनच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या तेज बहादूर यांचा अर्ज काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आला. तेज बहादूर यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतली होती. मात्र कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. तेज बहादूर यांची उमेदवारी रद्द का झाली? वाराणसीमधून समाजवादी पक्षातून लोकसभेसाठी उभे असलेले आणि बीएसएफमधून निलंबित केलेले तेज बहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. आपला उमेदवारी अर्ज रद्द केल्यामुळे तेज बहादूर नाराज आहेत. 'माझा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द केला गेला. मला मंगळवारी सकाळी पुरावे देण्याचे आदेश दिले. मी पुरावे सादर केले. पण तरीदेखील माझा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. त्यामुळे मी आता सुप्रीम कोर्टात धाव घेणार' असल्याचं तेज बहादूर म्हटलं होतं. खरंतर, तेज बहादूर यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांना बीएसएफमधून निलंबित केल्याची वेगवेगळी कारणं त्यांनी लिहिली होती. त्यामुळे तेज यांची तक्रार निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. यासंदर्भात निवडणूक आयोगाचे अधिकारी सुरेंद्र सिंह यांनी तेज बहादूर यांना नोटीस पाठवली होती. अभिनयापेक्षा स्वरा भास्करची राजकारणात का होतेय चर्चा, पाहा SPECIAL REPORT
    First published: