कोलकाता, 21 मे : पश्चिम बंगालमधील प्रवासी मजुरांना दुहेरी संकटाला तोंड द्यावं लागत आहे. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर अनेक कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यानंतर राज्यात परतलेल्या लोकांची घरेही अम्फान चक्रीवादळामुळे उडून गेली आहेत. जमाल मंडल सोमवारी बेंगळुरूतून दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील त्याच्या गावी पोहोचला. त्याच्या घरच्या लोकांना भेटून आनंद झाला पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही.
बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळाने हाहाकार उडाला आहे. यामुळे झालेल्या पावसात जमाल मंडलचं घरही वाहून गेलं. जमला त्याची पत्नी आणि चार मुलींसह सध्या एका शिबिरामध्ये राहत आहे. एका न्यूज चॅनेलशी बोलताना जमाल म्हणाला की, सोमवारी मी घरी पोहोचलो तेव्हा अडचणी संपतील असं वाटलं. पण ते चुकीचं होतं. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली त्यानंतर जे काही उरलं होतं ते चक्रीवादळाने नेलं. मला नाही माहिती मी आता काय करेन, कसं राहीन, कुटुंबाचा सांभाळ कसा करायचा असे अनेक प्रश्न समोर आहेत.
दक्षिण परगणा जिल्ह्यातील शेकडो प्रवाशांची हीच कथा आहे. पश्चिम बंगालमध्ये अम्फानमुळे आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू झाला आहे. कोलकात्यासह राज्यातील अनेक भागात चक्रीवादळाने प्रचंड हानी झाली आहे. जमीर अली यांनी सांगितलं की, 2009 मध्ये आलेल्या ऐला चक्रीवादळानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्या राज्यात कामासाठी जाण्याचा निर्णय घेतला होता.
हे वाचा :
Amphan महाचक्रीवादळाचा विध्वंस या फोटोंतून आला समोर; 72 जणांचे गेले बळी
ऐलानंतर काम शोधण्यासाठी बेंगळुरूला गेलो. 10 वर्षे त्या ठिकाणी काम केलं पण लॉकडाऊमुळे बेरोजगारी नशिबी आली. त्यामुळे 15 दिवस पायी चालत, ट्रक आणि बसने प्रवास करत घरी पोहोचलो. पण दुसऱ्याच दिवशी घर उद्धवस्त झालं. भाऊ बेपत्ता झाला असं जमीरने सांगितलं.
हे वाचा :
लॉकडाऊनमुळे हरवलेले पिता सापडले, 3 वर्षांपूर्वी पडले होते घराबाहेर मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.