मराठी बातम्या /बातम्या /देश /

बस जात असताना कोसळली दरड; जीव मुठीत धरुन पळाले प्रवासी, थरकाप उडवणारा LIVE VIDEO

बस जात असताना कोसळली दरड; जीव मुठीत धरुन पळाले प्रवासी, थरकाप उडवणारा LIVE VIDEO

LIVE VIDEO of landslide in Nainital: दरड कोसळतानाचा आणि थरकाप उडवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. उत्तराखंडमधील नैनिताल येथील ही घटना आहे.

  • Published by:  Sunil Desale
नैनिताल, 21 ऑगस्ट : मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये दरड कोसळणे, भूस्खलनाच्या घटना समोर येत आहेत. आता नैनिताल येथून एक धक्कादायक आणि थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. शुक्रवारी (20 ऑगस्ट 2021) नैनितालच्या वीरभट्ट पुलाजवळ अचानक दरड कोसळली (Landslide in Nainital). रस्त्यावरुन प्रवासी बस जात असतानाच ही दरड कोसळली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नैनिताल-ज्योलीकोट-कर्णप्रयाग राष्ट्रीय मार्गावर वीरभट्टी पूलाजवळ बलियानाला येथे ही दरड कोसळली आहे. दरड कोसळून टेकडीचा एक भलामोठा भाग महामार्गावर आला. त्याच दरम्यान रस्त्यावरुन बस जात होती. दरड कोसळत असल्याचं पाहून चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवली. Lockdown टाळायचा असेल तर कोणी कितीही चिथावलं तरी त्याला दाद देऊ नका : मुख्यमंत्री चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. बस थांबताच प्रवाशांनी बसमधून बाहेर पडत तात्काळ पळ काढला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. न्यूज एजन्सी एएनआयने दरड कोसळतानाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. बस थांबताच प्रवाशांनी आरडाओरड करत बसमधून खाली उतरले. दरड कोसळत असल्याचं पाहून कुणी बसच्या दरवाजातून तर कुणी बसच्या खिडकीतून खाली उडी घेतली. उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे अल्मोडा, बागेश्वरसह कुमाऊं या भागांचा संपर्क तुटला आहे. हल्द्वानी आणि काठगोदाम जवळ पोलिसांनी वाहनांना थांबवले आहे.
First published:

Tags: Uttarakhand

पुढील बातम्या